जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे भुसावळ येथील के. नारखेडे महाविद्यालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन व डिस्पोजेबल मशीन देण्यात आले. मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी रोटरी क्लब जळगाव नेहमीच कार्य करीत असतो, असे यावेळी अध्यक्ष संदीप शर्मा यांनी सांगितले. डॉ. तुषार फिरके यांनी मुलींना आरोग्य आणि प्रकल्पाविषयी माहिती दिली. याप्रसंगी सचिव मनोज जोशी, संस्थेचे चेअरमन पी.व्ही. पाटील, नॉनमेडिकल कमिटी चेअरमन जितेंद्र ढाके, डॉ. काजल फिरके, राजेश वेद, प्राचार्य श्रीवास, विकास पाचपांडे यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लब जळगावतर्फे वेल्डिंग कामगारांची नेत्रतपासणी
जळगाव : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे एमआयडीसीमधील स्वामी वेसल्स कंपनीच्या वेल्डिंग काम करणाऱ्या ३५ कामगारांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. तुषार फिरके यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले. क्लबतर्फे वर्षभर विविध ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संदीप शर्मा यांनी दिली. याप्रसंगी मानद सचिव मनोज जोशी, मोहन कुळकर्णी, जितेंद्र ढाके यांची उपस्थिती होती.
फोटो : २१ रोटरी (व्हीपीबी फोल्डर)