शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड उपसा सिंचनच्या नावावर इतर शहरांसाठी वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:19 IST

अनेक गटांवरून अवैध उचल

ठळक मुद्दे भरधाव वाहनांमुळे होताय अपघात

जळगाव : धरणगाव तालुक्यातील आव्हाणीचा गिरणा नदीचा ठेका बोदवड उपसा सिंचनच्या कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, या ठेक्यावरुन अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून येत आहे. दररोज शेकडो डंपर व ट्रॅक्टरव्दारे उपसा होत असल्याने आव्हाणी व आव्हाणे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.बोदवड उपसासिंचनच्या कामासाठी शासकीय ठेका असल्याने त्या ठिकाणाहून सिंचनाच्या ठिकाणावरच वाळू पोहचविणे आवश्यक आहे. मात्र, ठेक्यावरील काही ठेके दारांकडून शासकीय ठेक्याचा नावावर वैयक्तिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राची भिषण अवस्था झाली असून, नदीपात्रात अनेक ठिकाणी खडक लागला असल्याने भूजल पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे.आव्हाणेच्या पात्रातून उपसाबोदवड उपसा सिंचनसाठी केवळ आव्हाणीचा ठेका निश्चित करण्यात आला आहे. मात्र, आव्हाणे, खेडी या गावांमधील गिरणा नदीपात्रातूनही वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खेडी येथील बाळू चौधरी यांनी तीन दिवसांपुर्वी वाळू व्यावसायिकांना विरोध केल्यानंतर चौधरी यांना घरात जावून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आव्हाणी येथील एका ग्रामस्थालाही वाळू व्यावसायिकांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. ग्रामस्थांना वाळू व्यावसायिकांच्या मुजोरीचाही सामना करावा लागत आहे.वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर चालक हे भरधाव वेगाने वाहतूक करत असून यामुळे वाहनधारकांचाही जीव धोक्यात येत आहे. बुधवारी सकाळी १० वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने आव्हाणे येथील प्रशांत चौधरी या युवकाच्या मोटारसायकलला धडक दिली. ऐनवेळी प्रशांत चौधरीने मोटारसायकलवरून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या मोटालसायकलचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर वाळू व्यावसायिक व ग्रामस्थांमध्ये चांगलीच हाणामारी देखील झाली. मात्र, या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.वाळू व्यावसायिकांसोबत साटेलोटेशासकीय ठेक्याचा नावावर सुरु असलेला या गोरखधंद्यात वाळू व्यावसायिंक व ठेकेदारांनी आपआपसात मिलीभगत करून घेतली आहे. पहाटे ३ वाजेपासून गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची अक्षरश जत्रा भरलेली दिसून येत आहे. एकाच वेळी नदीपात्रात १०० हून अधिक वाहनांव्दारे वाळू उपसा होत आहे. ३ हजार ब्रास वाळू या ठिकाणाहून उचलण्याची परवानगी असताना त्याहून अधिक वाळू उपसा झाल्याचे काही वाळू व्यावसायिकांनी खासगीत माहिती दिली आहे.