शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:26 IST

तिघांना अटक

ठळक मुद्देसतत ट्रॅक्टर व डंपर पळविण्यामागे गौडबंगाल काय?

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (२०, रा.शाहू नगर, जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (२९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (२७, रा.सावखेडा, ता. जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.म्हसावद मंडळाधिकाऱ्यांच्या पथकाने एक ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले होते. या ट्रॅक्टर मालकाला नोटीसही बजावण्यात आलेली होती, असे असताना शनिवारी रात्री साडे दहा वाजता दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून ट्रॅक्टर पळवून नेले. हे ट्रॅक्टर व दोन दुचाकी (क्र.एम.एच.१९ टी.५१६५ व एम.एच.१९ सी.डी.१०५१) तलाठी रमेश वंजारी यांना पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे आढळून आले. तेथे मोहसीन, शाहीद व महेंद्र असे तिघं आढळून आले.याप्रकरणी रात्री तिघांविरुध्द ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तपासी अमलदार महेंद्र बागुल व सहकाºयांनी अटक केली. दरमयान, तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.का घडताहेत वाहने पळविण्याचे प्रकारजिल्हाधिकारी कार्यालय आवारातून सात ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर दुसºयाच दिवशी आणखी एक डंपर पळविण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी एक ट्रॅक्टर पळविण्यात आले. गुरुवारपासून सलग तीन दिवस वाहने पळविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातून तेही सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक असताना वाळूचे वाहने पळविले जात असतील तर इतर ठिकाणी वाहने कसे सुरक्षित राहतील. काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली. वारंवार याच दोन्ही कार्यालयातून वाहने पळविले जात असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची ओरड होत आहे.