तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने येथे १५ कोटींची वाघूर धरणावरील पाणी योजना तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने मंजूर केली होती. त्यात कासमपुरा, म्हसास, रामेश्वर तांडा या गावांसाठी एकत्रित अशी योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, फडणवीस सरकारच्या शेवटी शेवटी घाईघाईत घेतलेल्या काही निर्णयांना राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. त्यात ही योजना अडकून पडलेली होती. मात्र, विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून लोहारे गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर करून घेतली आहे.
लोहारे गावाची पाणी समस्या आता कायमची दूर होणार असल्याची माहिती सरपंच जैस्वाल यांनी यावेळी दिली. ही योजना मंजूर होण्यासाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, संजय गरुड, रावसाहेब पाटील, जि. प. सदस्य दीपकसिंग राजपूत, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर पोपट महाजन, जि. प. सदस्य अरुण रूपचंद पाटील यांनी वेळोवेळी सहकार्य केले असल्याने त्यांचे आभार सरपंच अक्षय जैस्वाल यांनी यावेळी मानले.
ही ई-निविदा १२ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून ०६ ऑगस्ट रोजी उघडण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे यावेळी देण्यात आली. यावेळी सरपंच अक्षय जैस्वाल यांच्यासोबतच ग्रामपंचायात सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी हजर होते.