शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल येथे सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:11 IST

जनता कर्फ्यू सुरू : नागरिक आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

एरंडोल : येथे जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूस पहिल्याच दिवशी गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. या बैठकीत ९ ते १३ जुलैपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मेनरोड, फुले-आंबेडकर व्यापारी संकुल, बसस्थानक परिसर, म्हसावद नाका परिसर, बुधवार दरवाजा परिसर, भाजीपाला बाजार तसेच मुख्य बाजारपेठ आदी सर्वच बंद होते. शहरात रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. सर्वच दुकाने बंद ठेवली होती.एरंडोल शहर व ग्रामीण परिसरात कोणाच्या रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक वाढ होत असल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सदरचा जनता कर्फ्यू नागरिकांनी यशस्वी करावा यासाठी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.नगरपालिकेतर्फे लाऊड स्पीकरवरून जनतेला कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन गल्लोगल्ली फिरून करण्यात येत होते.जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.५२ वाहन चालकांकडून दंड वसूलजनता कर्फ्यूच्या दरम्यान शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तर लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला म्हणून ५२ दुचाकीस्वारांवर कलम १४४ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.