शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावदा शहरात बायोडिझेलचे विक्री पंप बिनदिक्कतपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

रावेर : शहरातील बऱ्हाणपूर रोडवर रॉकेलमिश्रित बायोडिझेलची अवैध विक्री व साठवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून साडेतीन लाख ...

रावेर : शहरातील बऱ्हाणपूर रोडवर रॉकेलमिश्रित बायोडिझेलची अवैध विक्री व साठवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्याची धडक कारवाई रावेर पोलिसांनी केल्यानंतर पुन्हा गुरुवारी सावदा ते रावेर रस्त्यावर रीतसर पावती घेऊन बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या छोट्या मालवाहू वाहनाला पकडत सावदा शहरात बायोडिझेलची विक्री करणारा पंप सर्रास सुरू असल्याची बाब उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्यापपावेतो एकाही बायोडिझेल पंपाला अधिकृत परवानगी दिली नसताना, संबंधित महसूल प्रशासनाने बायोडिझेल पंपाचा मालक बाहेरगावी असल्याच्या सबबीखाली कागदपत्रे पडताळणीसाठी दिलेली उशीरमाफीची मुदत मात्र शंकास्पद असल्याची टीका जनसामान्यांत होत आहे.

रावेर पोलिसांनी शहरातील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या गोपी रोडलाइन्ससमोर आरोपी शेख शरीफ शेख मुस्लीम (वय ३८) व शेख फिरोज शेख मुस्लीम (वय २७) दोन्ही रा. फकीरवाडा, रावेर यांना नामांकित कंपनीच्या बायोडिझेलचा रिक्षावर बनवलेल्या रॉकेलमिश्रित बायोडिझेलच्या मोबाइल पंपाद्वारे अवैध विक्री व साठवणूक करताना ३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्याची धडक कारवाई केली होती.

दरम्यान, सावदा येथून बायोडिझेलची वाहतूक करणारे छोटे मालवाहू वाहन रावेरकडे येत असल्याची भणक रावेर पोलिसांना लागताच रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या पोलीस पथकाने त्या वाहनाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता संबंधिताने सावदा येथील बायोडिझेल विक्री करणाऱ्या पंपावरून रीतसर बिल घेऊन आल्याचे स्पष्ट केले होते.

त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क साधून बायोडिझेल विक्री करणाऱ्या पंपाची चौकशी करण्याबाबत माहिती दिली असता पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे व सावदा मंडळाधिकारी संदीप जयस्वाल यांना घटनास्थळी पाठवले. सदर बायोडिझेल पंपाचा मालक बाहेरगावी असल्याने कागदपत्र पडताळणीसाठी मुदत मिळावी, अशी विनंती संबंधित पंपचालकाने केल्याने महसूल प्रशासनाने त्याला कागदपत्रे सादर करण्यासाठी उशीरमाफी करून संबंधित वाहनचालकाला सोडून दिल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात आजपावेतो गुणात्मक दर्जाचे बायोडिझेल उत्पादन, विक्री, पुरवठा व साठवणूक करण्यासाठी एकही परवानगी दिली नसल्याने, कोणी बायोडिझेल विक्री, उत्पादन, साठवणूक वा पुरवठा करताना आढळून आल्यास त्याचेकडील अत्यावश्यक परवानगींची पडताळणी करून जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिल्या असताना सावदा शहरात बायोडिझेलचा बिनदिक्कतपणे पंप सुरू असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुरवठा निरीक्षक व महसूल भाग मंडळाधिकाऱ्यांनी सदर बायोडिझेल पंपचालकाला विचारणा केली असता त्याने मालक बाहेरगावी असून, त्यांच्याकडे अत्यावश्यक त्या परवानगी असल्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. संबंधित पंपमालकाकडील दस्तावेज पाहून बायोडिझेल पंपाच्या वैधतेची पडताळणी करणे शक्य होईल.

-उषाराणी देवगुणे, तहसीलदार, रावेर