जळगाव : रथ चौक परिसरातील दीपक तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी सागर शिंपी व उपाध्यक्षपदी दीपक तांबट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नुकतीच या कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. खजिनदार म्हणून योगेश कासार तर सदस्य म्हणून सुनील तांबट, योगेश वाणी, योगेश बोबडे, कवी सपकाळे, संजय वाणी, कपिल कासार, पंकज शर्मा, निलेश कासार, प्रमोद वाणी, राजेंद्र वाणी, गौरव शिंदे, अनुज शर्मा, प्रज्वल वाणी, प्रसाद गुरव, विजय तांबट, कवी कासार, आदित्य तांबट, परिष तांबट, किरण शिंपी, सौरभ तांबट, ओंकार तांबट, गोपाल वाणी, भूषण हरणे, श्रीकृष्ण वाणी, महेश भालेराव, दीपक ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे मंडळाचे ४९ वे वर्ष असून मुंबईच्या लालबागच्या राजाची प्रतिमूर्तीची स्थापना मंडळात केली जाणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाकडून जंतुनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप, मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.