शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

यावलचे ग्रामीण रुग्णालय वा:यावर

By admin | Updated: March 1, 2017 00:07 IST

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका:याचा अभाव : रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी यांच्यात संघर्ष; रुग्णालयाला कुलूप

यावल : यावल येथील ग्रामीण रुग्णालय वा:यावर आहे. रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णालयात उपचारांसाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांच्यात सतत संघर्ष होत आहे.दरम्यान, आज उपचारासाठी आलेल्या किनगाव खुर्दचे  माजी सरपंच सिराज पिंजारी यांच्यावर  यावल ग्रामीण रुग्णालयात    तातडीने उपचार करण्यात आले नसल्याच्या कारणावरून माजी सरपंचासह त्यांचे भाऊ उपसरंपच राजू पिंजारी     यांनी  ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा:यांना मारहाण करून शिवीगाळ व  धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचा:यांनी रुग्णालयाचे कामकाज बंद करून रुग्णालयाला कुलूप ठोकले आहे. तालुक्यातील किनगाव खुर्द येथील माजी सरपंच सिराज नसीर पिंजारी यांचा अपघात झाल्याने    त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात    उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर डय़ूटीवरील कर्मचारी कक्षसेवक मोहन चौधरी यांनी प्रथमोपचार केले. त्यांच्यावर  तत्काळ उपचार केले जात नसल्याचा पिंजारी आरोप करत आरडाओरड करत   पिंजारी  व त्यांचे भाऊ उपसरपंच राजू पिंजारी यांनी मोहन विठ्ठल चौधरी यांना व  आयसीटीसी समुपदेशक वसंत संदानशिव यांना  मारहाण करत अधिपरिचारिका शीतल ठोंबरे यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.  आम्ही सरपंच/उपसरपंच आहोत. तुम्ही येथे कसे राहता, तुमच्या बदल्या करतो अशा धमक्या दिल्या. अशी फिर्याद वसंत संदानशिव यांनी दिल्यावरून माजी सरपंच सिराज पिंजारी व उपसरपंच राजू पिंजारी यांच्याविरुद्ध भादंवि  कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास  फौजदार सुनीता कोळपकर करीत आहेत. रुग्णालय कर्मचारी वसंत संदानशिव यांचा सायंकाळी रक्तदाब वाढला. त्यांना तत्काळ 108 रुग्णवाहिनीद्वारे जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेनंतर रुग्णालयाला कुलूपया घटनेनंतर कर्मचा:यांनी दवाखाना बंद केला.  रात्री उशिरार्पयत रुग्णालय बंदच होते. घटनेची माहिती रुग्णालयाचे प्रमुख  डॉ. देवाशिष घोषाल, जिल्हा शल्यचिकित्सक यांना  देण्यात आली आहे. सिव्हिल सजर्न  डॉ. किरण पाटील बुधवारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी येणार  असल्याचे कर्मचा:यांनी सांगितले.  त्यानंतरच पुढील निर्णय कर्मचारी घेतील, असे सांगितले.  परस्परविरुद्ध तक्रार दरम्यान उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात  आलो असता डय़ूटीवरील कर्मचा:यांनी तत्काळ उपचार केले नाही. त्याचा त्यांना जाब विचारला असता कर्मचारी शीतल ठोंबरे, वसंत संदानशिव, मोहन चौधरी व परिचारिका पूनम सोनवणे यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार माजी सरपंच सिराज पिंजारी यांनी दिल्यावरून चौघांविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.    मंगळवारी   ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय प्रशासनात वारंवार खटके उडत असल्याने व संघर्षमय परिस्थिती निर्माण होत असल्याचे सविस्तर वृत्त   ‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले आहे.माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा..माजी सरपंच सिराज पिंजारी व उपसरपंच राजू पिंजारी यांच्याविरुद्ध भादंवि  कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सुनीता कोळपकर करीत आहेत.