शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोदवड येथे डॉक्टरअभावी ग्रामीण रुग्णालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:26 IST

डॉक्टरअभावी बोदवडचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर आहे.

ठळक मुद्देआॅक्सिजन बेडची सुविधा, पण डॉक्टरच नाहीजिल्हाधिकारी उद्घाटन करणार होते आॅक्सिजन बेडचे, पण डॉक्टरच नाहीकोरोनासारख्या संकटातही रुग्ण उपचारासाठी जाताहेत इतर तालुक्यातबोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी २० दिवसांपासून पुन्हा बंद पडले आहे. आॅक्सिजन बेडची सुविधा झाली असली तरी डॉक्टरच नसल्याने आॅक्सिजन बेड निरर्थक ठरत आहेत. कोरोनासारख्या संकटातही रुग्णांना उपचारासाठी इतर तालुक्यात दाखल करण्याची नामुष्की बोदवड ग्रामीण रुग्णालयावर आली आहे. परिणामी बोदवडचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर आहे.येथे कोरोना संक्रमण काळात दोन महिने एप्रिल व मेमध्ये वैद्यकीय अधिकाºयाअभावी बोदवडचे ग्रामीण रुग्णालय बंद होते. त्यामुळे नागरिकांसाठी बाह्यरुग्ण तपासणी बंद होती. तसेच घात अपघाताचे रुग्ण तपासणी तसेच मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र यासारख्या कामासाठी नागरिकांचे हाल होत होते. यानंतर ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने जूनच्या महिन्यात शेवटी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पवार हे मिळाले होते. त्यांनीही महिनाभर बाह्यरुग्ण तपासणी केली. परंतु त्यांनीही वैद्यकीय सेवेतील परीक्षेचे कारण देऊन रुग्णालय सोडले. यामुळे गेल्या २० दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयाला बाह्य रुग्ण तपासणी बंद झाली आहे.बोदवड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आजच्या स्थितीत येथे २५-३० रुग्ण दाखल आहेत. ज्यांच्या कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, असेच रुग्ण येथे उपचार घेत आहेत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरळ शेजारील तालुक्यात रेफर केले जात असल्याचे चित्र आहे.नगरसेवकही मुक्ताईनगरला दाखलदरम्यान, बुधवारी शहरातील एक नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. मात्र त्यांनाही मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय-कोविड सेंटरला दाखल करण्याची वेळ आली आहे.दिवसेंदिवस वाढतेय कोरोना संकटदिवसागणिका कोरोना संक्रमणाचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळत आहेत. बोदवड ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव येथे उपचारासाठी पाठवावे लागत आहे. असे असले तरी ग्रामीण रुग्णालय सुरू राहावे यासाठी राजकीय उदासीनता दिसून येत आहे.२० खाटांवर आॅक्सिजन पाइपलाइन सुविधाबोदवड येथील ग्रामीण रुग्णालयाला रोटरी क्लबच्या माध्यमातून २० खाटांवर आॅक्सिजन पाइपलाइन सुविधा केली. मात्र वैद्यकीय अधिकारीच नसल्याने या सुविधेचा काय उपयोग होणार आहे. या आॅक्सिजन पाईपलाईनचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असून किमान लोकार्पणपूर्तीपर्यंत तरी वैद्यकीय अधिकारी द्यावे, ही मागणी होत आहे.बाह्यरुग्ण तपासणीही बंदयेथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसाठी नियुक्त डॉक्टर यायचे. ते सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांची तपासणी करून निघून जायचे. गेल्या चार-पाच दिवसांपर्यंत ही स्थिती कायम होती. परंतु आता तर ही बाह्य रुग्ण तपासणीही बंद झाली आहे. परिणामी हे रुग्णालय आता वाºयावर आले आहे.डॉक्टरअभावी प्रसूतीच नाहीबोदवड ग्रामीण रुग्णालयाला शस्त्रक्रिया विभागही आहे. परंतु गेल्या २० दिवसांत एकही प्रसूती महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने झालेली नाही, तर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका क्रमांक १०२ हीसुद्धा टायर घासल्याने बंद पडली आहे.बोदवड येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळण्याबाबत जिल्हा आरोग्याधिकाºयांना माहिती देण्यात आली आहे.-डॉ.मनोज चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बोदवड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड