शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात शासकीय इमारती दिसणार एकाच रंगाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 18:01 IST

ग्रामीण भागात पंचायत समितीतर्फे होणाऱ्या सर्व बांधकाम आणि इमारती यापुढे एकाच विशिष्ट रंगात दिसणार आहेत. 

ठळक मुद्देअमळनेर : गटविकास अधिकारी वायाळ यांचा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पंचायत समितीतर्फे होणाऱ्या सर्व बांधकाम आणि इमारती यापुढे एकाच विशिष्ट रंगात दिसणार

संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीतर्फे होणाऱ्या सर्व बांधकाम आणि इमारती यापुढे एकाच विशिष्ट रंगात दिसणारआहेत.  महाराष्ट्रात प्रथमच हा उपक्रम अमळनेर तालुक्यात गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अमळनेर तालुक्याची आगळी वेगळी ओळख निर्माण होणार आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २६ शाळांच्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. सर्व बांधकामांना मरुन आणिक्रिम रंग देण्याचे आदेश ग्रामसेवक व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.शासकीय कामात एकसूत्रता यावी आणि शासकीय इमारतींची आगळी वेगळी छाप पडावी म्हणून पंचायत समिती अंतर्गत सर्व विकासकामे ,शासकीय कार्यालये, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे, राज्यस्तरीय आवास योजनेची घरकुले, शाळा इमारती, अंगणवाड्या, शौचालये,वॉल कंपाऊंड, दवाखाना, सामाजिक सभागृह आदींना एकाच प्रकारचे रंग मरून आणि क्रिम रंग लावण्यात येणार आहे. जयपूर शहराची गुलाबी शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याप्रमाणे अमळनेर तालुक्यातील शासकीय इमारतींची ओळख होणार आहे. यापूर्वीदेखील गटविकास अधिकारी वायाळ यांनी बांधावर झाडे लावण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. इमारतींना तसेच विविध विकास कामांना विशिष्ट रंग लावल्याशिवाय घरकुलाचा अंतिम हप्ता, विकास कामांची देयके मिळणार नाहीत, असा इशाराच वायाळ यांनी दिला आहे.

तामिळनाडू येथे प्रशिक्षणला गेल्यावर तेथील शासकीय कामे ठरावीक रंगाची दिसल्याने महाराष्ट्रात प्रथमच अमळनेर तालुक्यात हा प्रयोगराबवण्याचा निर्णय घेतला आहे.-संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,अमळनेर

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीAmalnerअमळनेर