शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पबजी गेम ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:43 IST

पालकांमध्ये चिंता : विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय हिंसक वृत्ती

पळासखेडे बुद्रुक, ता.जामनेर : सद्यस्थितीला पबजी या मोबाईल गेमने विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यक्तींना वेड लावले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंसकवृत्ती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.स्मार्ट फोनवर पबजी या मोबाईल गेमने लहान पासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. या गेमचे फॅड आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील तरूणाई सोबतच अल्पवयीन मुले या जिवघेण्या खेळाच्या आहारी गेले आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा व हिंसक प्रवृत्ती बळावत असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.स्पर्धेच्या युगात वावरताना झटापट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईल सह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. तसाच त्याचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नवनवीन मोबाईल गेममुळे तरूण पिढी कामधंदा सोडून तर विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईल गेम खेळण्यात दंग झाले आहे. मोबाईल गेममधील पबजी नावाच्या गेमने तर देशात धुमाकूळ घातला आहे.भारतासह जगभरात या गेमने मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सतत अपडेट होत असलेल्या या गेममध्ये विविध प्रकारे बदल होत असल्याने हा गेम खेळण्यास अनेक जण उत्सुक होतात. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. या खेळाच्या नादात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे.मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडिया वर टिकटॉक शॉर्ट व्हिडिओने चांगलेच थैमान घातले आहे. याचा गैरवापर होऊन अश्लील व्हिडिओ, मॅसेज पाठविले जात असल्याने शासनाने टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या पबजी गेमचा लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याने या गेमवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. @असा खेळला जातो पबजी गेमपॅराशूटद्वारे १०० खेळाडूंना एका आयलॅडवर उतरविले जाते. त्या ठिकाणी खेळाडूंना बंदूक शोधून शत्रूंना टिपावे लागते. शेवटी जो वाचेल तो विजयी ठरतो. हा गेम गृप बनवून ही खेळता येतो. शेवटपर्यंत पोहचल्यानंतर सर्व जण विजयी ठरतात. या गेमला डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल मध्ये दोन जिबीची स्पेस आवश्यक असते.