शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जादा गतीने रेल्वे चालविण्याची चाचणी - डी.के. शर्मा

By admin | Updated: January 15, 2017 00:54 IST

शनिवारी भुसावळ विभागातील निफाड-मनमाड दरम्यान 120 प्रती कि. मी. वेगाने रेल्वे गाडी चालवून रेल्वे ट्रॅकची चाचणी घेण्यात आली

भुसावळ,   : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जादा वेगाने प्रवासी गाडय़ा चालविण्याची शक्यता गृहीत धरुन शनिवारी या विभागातील निफाड-मनमाड दरम्यान 120 प्रती कि. मी. वेगाने  रेल्वे गाडी चालवून रेल्वे   ट्रॅकची  चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी शनिवारी भुसावळ रेल्वेस्थानकावर पत्रकार परिषदेत दिली.प्रारंभी मध्य रेल्वेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.डी.के. शर्मा यांनी  सांगितले की, या तपासणी दौ:यात  रेल्वेचे विद्युत, लेखा विभाग, यांत्रिक, अभियांत्रिकी, सुरक्षा, संरक्षा (सेफ्टी), अभियांत्रिकी, कार्मिक आदी विभागाचे मुंबई मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या पाहणी दौ:यात रेल्वे ट्रॅक, प्रवाशांसाठी  देण्यात आलेल्या सोयी-सुविधा, ओएचई आदींची पाहणी व तपासणी करण्यात आली.भविष्यात रेल्वे गाडीचा वेग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निफाडपासून 25 कि.मी. अंतरार्पयत 120  प्रती तास वेगाने रेल्वे चालवून इंजीन, डबे व  रेल्वे ट्रॅकची चाचणी घेण्यात आली. सध्या आपण 110 कि.मी.प्रती तास वेगाने गाडी चालवित आहोत. गाडय़ांची गती वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला नरेंद्र पाटील, भुसावळचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता, एडीआरएम अरुण धार्मिक, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यालयातील सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लिफ्टचा वापरविशेष म्हणजे शर्मा यांचे फलाट क्रमांक आठवर आगमन झाले. नवीन रेल्वे उड्डाणपुलावरुन  ते पायी आले. त्यांनी फलाट क्रमांक तीनला जोडलेल्या  लिफ्टचा वापर करून ते खाली उतरले. एकप्रकारे त्यांच्याच हस्ते लिफ्टचे लोकार्पण झाले. रेल्वे स्थानकावरील विशेष कक्षात खासदार रक्षा खडसे यांनी डी.के. शर्मा यांच्याशी रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. भुसावळातील आराधना कॉलनीतील सबवेबाबतही त्यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन, एससीएसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, रेल कामगार सेना, रेल्वे कर्मचारी ओबीसी संघटना, प्रवासी संघटना प्रतिनिधींनी शर्मा यांची  घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.  (प्रतिनिधी)