शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून तीन मोबाईलसह ३७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 19:35 IST

अमळनेर स्थानकावरील घटना : दोन चेरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश

अमळनेर : येथील रेल्वे स्थानकावर धावत्या सुरत छापरा ताप्तीगंगा रेल्वगाडीत चाकूने वार करत तिघांनी चार प्रवाशांकडून तीन मोबाईल व रोख असा ३७ हजार रुपयांचा माल लुटला. ही घटना चार रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. आरोपी रेल्वेतून उतरून पळालेल्या तिघांपैकी दोन आरोपींना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.सुरत छापरा ताप्तीगंगा एक्सप्रेसची अमळनेर रेल्वे स्थानकावर गती कमी झाली असता तिघे जण गाडीत चढले. एकाने चाकू मारून तसेच मारहाण करून राजस छदीलाल यादव, रा.पारसितपुर, उत्तरप्रदेश ह.मु. कडोद्रा, सुरत तसेच धुरेंद्र बलेश्वर महातो, गोलुकुमार भरत महातो रा.धरमपूर खैरा, जि.छापरा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने मारहाण करून जखमी केले. त्यांच्याकडून तीन मोबाईल आणि खिशातील रोख १८ हजार ५०० रुपये असा एकूण ३७ हजार रुपयांचा माल लुटून लागलीच चालत्या गाडीतून उतरले. याबाबत नंदुरबार रेल्वे स्टेशनला लुटमारीचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता लोहमार्ग औरंगाबादचे एलसीबीचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांनी भेट देऊन संशयित आरोपींचे फोटो तक्रारदारांना दाखवून चौकशी केली. त्यानुसार गलवाडे रोडवरील तन्वीर शेख, राहुल पंढरीनाथ पाटील उर्फ रामजाने राकेश येवले हे तिन्ही आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मधुकर विसावे, राजेंद्र गोराळे, महेंद्र पाटील आदींच्या मदतीने दोन्ही आरोपींचा मागोवा घेऊन तांबेपुरा रस्त्यावरील पुलाजवळ पकडले.मुख्य आरोपी रामजाने व राकेश येवले हे दोघे संत सखाराम महाराज पुलाजवळ असल्याची माहिती दुपारी अडीच वाजेला मिळल्यानंतर पोलीस निरीक्षक गढरी, सपोनि नवघरे व पीएसआय जिव्हारे यांनी पाठलाग करून रामजानेला झडप घालून पकडले. त्याच्याजवळ कुकरी हत्यार आढळून आले. त्यावेळी त्याच्याकडून मोबाईल जप्त केले. मात्र राकेश नदीत पळून गेला.