मुक्ताईनगर : तालुक्यातील रुईखेडा गावातील अंगणवाडीमध्ये महिन्यातील पोषण आहार हा कार्यक्रम मदतनीस व सेविका यांच्यामार्फत शनिवारी करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रुईखेडा येथील सरपंच उषा गुरचळ तर बालविकास प्रकल्प अधिकारी गोयल, अंगणवाडी रुईखेडा बीटच्या मुख्य सेविका कल्पना तायडे, सुनीता पाटील, रुईखेडा पीएससीचे मेश्राम व तसेच स्तनदा माता व किशोरवयीन मुली, महिला व गावकरी उपस्थित होते.
यशोदाबाई महाजन
वाघोड, ता. रावेर - येथील रहिवासी यशोदाबाई रघुनाथ महाजन (७६) यांचे ९ सप्टेंबर रोजी निधन झाले. महाराष्ट्र विद्यामंदिरचे सेवानिवृत्त शिपाई रघुनाथ आसाराम महाजन यांच्या त्या पत्नी तर भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक रवींद्र महाजन यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.