शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:17 IST

चालकाचे पलायन

ठळक मुद्दे डी.पी.अ‍ॅक्टनुसार दुसरा गुन्हा दाखल

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओचे पथक मध्यरात्री रिक्षा, दुचाकीचा वापर करुन साध्या वेशात रस्त्यावर उतरले होते. या पथकाने कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क परिसरात पहाटे तीन वाजता विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. पथकाला पाहून चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले. दरम्यान, याप्रकरणी आरटीओने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये फिर्याद देवून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. याआधी नशिराबाद पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.अवैध वाळू व वाहतुकीबाबत महसूल, पोलीस व आरटीओ असे तिन्ही विभागांनी कारवाईसाठी स्वतंत्रपणे पथके नेमली आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी बुधवारी रात्री वाहन निरीक्षक कमलेश चव्हाण, महेश देशमुख, रणजीत पाटील व दीपक साळुंखे यांचे पथक तयार केले होते. एक अधिकारी दुचाकीवर, दोन अधिकारी रिक्षाने तर एक जण खासगी कारने या भागात गेले होते. हे पथक पहाटे तीन वाजता कानळदा रस्त्यावर विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर अडविले असता चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी मारुन पोबारा केला.चेसीस क्रमांकावरुन शोधला मालकचालक पळून गेल्यानंतर पथकाने हे ट्रॅक्टर स्वत:चालवून शहर पोलीस स्टेशनला लावले. क्रमांक नसल्याने ट्रॅक्टरचा चेसीस क्रमांक घेऊन गुरुवारी ट्रॅक्टरचा क्रमांक (क्र.एम.एच.१९ सी.व्ही.०५५६) निष्पन्न झाला. त्यानंतर मालक निष्पन्न झाला. राहूल सुरेश सपकाळे (रा.धामणगाव, ता.जळगाव) या व्यक्तीच्या नावावर हे ट्रॅक्टर आहे.आता नव्या कायद्याचा वापरवाळू प्रकरणात दंडात्मक कारवाईसोबतच आरटीओने आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये (डी.पी.अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला गुन्हा नशिराबादला आरटीओनेच दाखल केला आहे तर शहर पोलीस स्टेशनला हा दुसरा गुन्हा असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. वाळू वाहतूक रोखण्यासाठी आरटीओचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.