शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST

भुसावल रेल्वे विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त जळगाव : भुसावल रेल्वे विभागातुन ३० एप्रिल रोजी विविध विभागातील ५४ ...

भुसावल रेल्वे विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव : भुसावल रेल्वे विभागातुन ३० एप्रिल रोजी विविध विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्ती निमित्त रेल्वेतर्फे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके उपस्थित होते. सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.

१० हजार ग्राहकांनी पाठवले रिडिंग

जळगाव : कोरोनामुळे वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडिंग पाठवण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जळगाव विभागातील १० हजार ग्राहकांनी स्वतः हुन रिडिंग पाठवले आहे. ग्राहकांना रीडिंग पाठविण्यासाठी मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या पद्धतीने ऑनलाईन रिडिंग पाठवण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

शनीपेठेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

जळगाव : शनीपेठेत अमृतच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती न झाल्याने वाहन धारकांची मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

रेल्वे पोलिसांच्या बदल्या

जळगाव : भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनमाड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी सबंधित रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना जून पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव रेल्वे स्टेशनवर विविध राज्यातील व भुसावळ विभागातील नवे रेल्वे पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.