चाळीसगाव, जि.जळगाव : रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव आणि रोटरी मिलेनियम यांच्या नूतन पदाधिकाºयांचा पदभार सोहळा नुकताच झाला. अध्यक्ष म्हणून संदीप जैन व डॉ.संदीप देशमुख यांची निवड करण्यात आली. मावळत्या पदाधिकाºयांना यावेळी निरोप देण्यात आला.माजी प्रांतपाल गोपाल मंधानिया यांच्यासह सहाय्यक प्रांतपाल डॉ.राहुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा रंगला. नूतन अध्यक्ष म्हणून डॉ.संदीप देशमुख यांच्या कडे रोटरीचे चार्टर सोपविण्यात आले. नूतन सचिवपदी म्हणून रोशन ताथेड, रोटरी मिलेनियमच्या नूतन अध्यक्षपदी संदीप जैन, सचिवपदी डॉ.गजेंद्र आहिरराव, रोटरॅक्ट क्लब आॅफ क्लासिकच्या अध्यक्ष म्हणून आकाश पोळ, रोटरॅक्ट क्लब आॅफ इलाईटच्या अध्यक्षपदी प्रवीण जाधव आदींनी पदभार स्वीकारला.यावेळी तीन नविन रोटरी कम्युनिटी कॉर्पसची स्थपना करण्यात आली. त्यात प्रिंप्री, चितेगांव, गणेशपूर या गावांचा समावेश आहे. विविध क्षेत्रतील मान्यवर व रोटरी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.सामाजिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात रोटरीने नेहमी अग्रणी योगदान दिले असून, हाच वसा घेऊन आम्ही काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया संदीप जैन यांनी व्यक्त केली. नूतन पदाधिकाºयांचा सत्कारही करण्यात आला.
चाळीसगावला रंगला रोटरी पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:19 IST
रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव आणि रोटरी मिलेनियम यांच्या नूतन पदाधिकाºयांचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला.
चाळीसगावला रंगला रोटरी पदग्रहण सोहळा
ठळक मुद्देसंदीप जैन, डॉ.संदीप देशमुख यांची निवडमाजी प्रांतपाल गोपाल मंधानिया व डॉ.राहुल कुलकर्णी यांची उपस्थितीनूतन पदाधिकाऱ्यांची निवडमावळत्या पदाधिकाऱ्यांना निरोपतीन गावांना रोटरी कम्युनिटी