शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

जळगाव : रोटरी क्‍लब ऑफ जळगाव गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. मावळते अध्यक्ष विनायक बाल्दी यांनी नूतन अध्यक्ष उमंग ...

जळगाव : रोटरी क्‍लब ऑफ जळगाव गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. मावळते अध्यक्ष विनायक बाल्दी यांनी नूतन अध्यक्ष उमंग मेहता यांना तर सचिव सुनील आडवाणी यांनी डॉ. नीरज अग्रवाल यांना पदभार दिला.

सुनील आडवाणी यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर केला. अध्यक्ष उमंग मेहता यांनी मनोगत व्यक्त करुन नूतन कार्यकारिणी घोषित केली. यावेळी सीए प्रीती मंडोरा संपादित क्‍लबच्या त्रैमासिकाचे व राकेश सोनी यांची संकल्पना असलेल्या रोटरी कार्डचे प्रकाशन करण्यात आले.

निखील चौधरी, डॉ. गजानन पाटील, स्वप्नील पलोड, राहुल कोटेचा, अनुप अग्रवाल, निखील रेदासनी, स्मिता पलोड, रचना पलोड या नवीन सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. रोटरी वर्ष २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांचा तसेच नूतन अध्यक्ष व सचिवांच्या कुटुंबीयांचा देखील सत्कार करण्यात आला.

रोटरी गोल्डसिटीने गरजूंच्या जीवनातील अंधार नाहीसा केला

गेल्या २२ वर्षात रोटरी क्‍लब ऑफ जळगाव गोल्डसिटीने छोट्या पणती प्रमाणे विविध प्रकल्प व उपक्रमांद्वारे गरजू व्यक्तीच्या जीवनातील अंधकार नाहीसा करुन त्यांचे जीवन प्रकाशमय करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे, असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक डॉ. भरत पंड्या यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना केले.

प्रांतपालांच्या संदेशाचे वाचन सहप्रांतपाल विष्णू भंगाळे यांनी केले. अतिथींचा परिचय सतीश मंडोरा यांनी तर प्रा.ममता दहाड यांनी नवीन सदस्यांचा परिचय करुन दिला.