जळगाव : सोबत राहणा:या मित्रानेच मित्रावर रॉडने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शनी पेठेतील घरकुल चौकात घडली. या हल्लयात रवींद्र मोहन शिंदे उर्फ तात्या (रा.कांचन नगर, जळगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पिंटय़ा धनगर यालाही मारहाण झाल्याचे रवींद्रच्या नातेवाईकांनी सांगितले.अजय राजू सोनवणे (रा.वाल्मिक नगर, जळगाव) याने रवींद्रवर हल्ला केल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. रवींद्र हा बेशुध्दावस्थेत असल्याने हल्लयाचे कारण समजू शकले नाही, मात्र या घटनेनंतर अजय फरार झाला. लोखंडी रॉडने मानेजवळ हल्ला झाल्यामुळे रवींद्रच्या कानातून रक्त येवू लागले. पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रय} केला, परंतु रवींद्र बेशुध्द असल्याने माहिती मिळू शकली नाही. रवींद्र व अजय दोघंही मित्र आहे,. त्यांच्यात नेमका काय व कशामुळे वाद झाला हे समजू शकले नाही असेही नातेवाईकांनी सांगितले.
मित्रानेच केला मित्रावर रॉडने हल्ला
By admin | Updated: February 1, 2017 00:23 IST