पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि रोझोदा गावातील काम अपूर्ण असून रोझोद्यात कामाची सुरुवात झाली आहे. हा रस्ता मोठा असून यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. बोरघाटात मात्र हा रस्ता लहान तथा वळणदार घाट असल्याने परप्रांतीय मोठमोठे ट्रक पाल-रावेर मार्गे वळवण्यात येतात. हा महामार्ग मध्य प्रदेश व राजस्थानला जोडला गेला असून यात झिरन्या, खरगोन, खलघाट, सेधंवा, इंदूर, व रतलाम अशा शहरांना जोडला गेला आहे. खरगोन ते खलघाट हा महामार्ग दुहेरीकरणाचे काम मध्य प्रदेश शासनाने सुरू केले आहे. खलघाट ते चित्तोडगड हा सलग महामार्ग दुहेरीकरणाचे काम काही वर्षापूर्वीच झाले आहे.
रस्तालुटीचे प्रकार
या महामार्गाचे काम आमोदा ते पाल असे ९८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपासून सुरू राहिले. दरम्यान काही दिवसा आडरात्री बोरघाटात वळणावर झाड आडवे टाकून रस्तालूट करण्यात येते यात पधंरा ते वीस जणांची टोळी अचानक हल्ला करून वाहनचालकाच्या जवळील सर्व रक्कम मोबाइल हिसकावून घेतात, मानेवर चाकूचा धाक दाखवून तथा बेदम मारहाण करून रस्तालूट होते. काही जण तर मार खाण्याअगोदरच जवळील सर्व रक्कम रस्तालूट करणाऱ्या टोळीच्या हवाली करतात.
एकाही आरोपीचा तपास नाही
रस्तालुटींबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आतापर्यंत एकाही सशंयित आरोपीला ताब्यात घेतले नाही. घनदाट जंगल व रात्रीचा फायदा घेत रस्तालूट करणारे रात्री पसार होतात.
उपाय नव्हे हा तर अपाय!
रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण हाती काही काही नसते. रस्तालूट थाबंवाबची कशी. असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. ही रस्ता लूट थांबविण्यासाठी सावदा पोलिसांनी एक विचित्र शक्कल केली आहे. नाकाबंदी केली तर वाहने न जाता रस्तालूटच होणार नाही, असा विचार करीत रात्री नाकाबंदीच केली आहे.
अशे आदेशच सावदा पोलिसानीं वन्यजीव नाक्यावर असलेल्या वनमजुरांना दिले. याबाबत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी दिसून येत आहे.
घाटात बंदूकधारी पोलीस नेमण्याची मागणी
वन्यजीव वनक्षेत्रपाल पालचे अधिकारी यांना रस्ता बंदबाबत विचारणा केली, असता घाट परिसरात जेथे रस्तालूट होते त्या ठिकाणी बदूंकधारी पोलीस कर्मचारी पाचारण केले तर रस्तालूट होणार नाही. पण घाटात रात्री थांबेल कोण? असा प्रश्न आहे. तरी पोलीस विभागाकडे बंदूकधारी कर्मचारी घाटात रात्री नेमावे, अशी मागणी होत आहे.
रात्री नऊ वाजेला नाक्यावर पोलिसाच्या कृपेने असा मार्ग बंद केला जातो.