शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आग लावल्याच्या संशयावरून उसळली फातेमानगरात दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश पाटील हा तरुण नरेंद्र मानसिंग पाटील यांच्या मालकीच्या एमआयडीसीतील एस. ५३ सेक्टरमधील शुभसखी या ...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश पाटील हा तरुण नरेंद्र मानसिंग पाटील यांच्या मालकीच्या एमआयडीसीतील एस. ५३ सेक्टरमधील शुभसखी या पीव्हीसी पाईप कंपनीत कामाला आहे. शनिवारी (दि. १३) त्याची रात्रपाळीची ड्यूटी होती. रात्री १० वाजता सतीश, पवन गणेश पाटील व अविनाश सुभाष दांडगे असे तिघेजण दुचाकीने जेवणाचा डबा घ्यायला कुसुंबा येथे गेले होते. तेथून परत येत असताना फातेमानगराच्या कॉर्नरजवळ चिकनच्या दुकानाजवळ आग लागल्याचे दिसल्याने तिघेजण तेथे थांबले असता तेथे पांढऱ्या कारमधून तसेच दुचाकीवरून काहीजण आले. त्यावेळी तिघेजण कंपनीत निघून गेले. त्यानंतर कार व दुचाकीस्वार त्यांच्यामागे आले. आग याच मुलांनी लावल्याचा संशय व्यक्त करून या लोकांनी अचानक रात्री ११.१५ वाजता दगडफेक केली. त्यानंतर कंपनीचे शटर उघडून आतमध्ये प्रवेश करून तोडफोड करून पवन पाटील, अविनाश दांडगे, मंगेश सुभाष पाटील, प्रवीण प्रल्हाद कुंभार, नितीन विठ्ठल पाटील व सतीश पाटील या कामगारांना रॉड व बॅटने मारहाण करायला सुरुवात केली. मालक नरेंद्र पाटील व पवन यांच्या दुचाकीची तोडफोड केली. घटनास्थळी दाखल झालेले कंपनीचे मालक नरेंद्र पाटील यांनाही या जमावाने रॉडने बेदम मारहाण केली. यात चौघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

सालार गटाचीही तक्रार

रेहान सालार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चुलत भाऊ साजीद सालारसोबत कारने (एमएच १९ सीव्ही ६५५५) फातेमानगरात काकूकडे गेले असता एमआयडीसीतील एस सेक्टरजवळील मराठे पाईपसमोर पाच ते सहाजणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन कारवर दगडफेक केली. तेव्हा पाठीमागे भाऊ आमीर अब्दुल रज्जाक सालार हा एमएच १९ सीयू ३५२९ ही गाडी घेऊन जात असताना त्यांच्यावरही या लोकांनी दगडफेक केली. लोकांची गर्दी झाल्याचे पाहून हे लोक शुभसखी कंपनीकडे पळून गेल्याचे म्हटले आहे.