शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिमा लागू यांनी जळगावात सखींना दिला होता यशाचा कानमंत्र

By admin | Updated: May 18, 2017 18:13 IST

त्यांच्या निधनाने जळगावकर हळहळले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे 18 रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावकर हळहळले. 12 वर्षापूर्वी लोकमत सखी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सखींना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला होता. त्यांच्या या आठवणींनी सखी हळहळल्या. आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना भुरळ घालणा:या रिमा लागू यांच्या निधनाने जळगावकरांना धक्का बसला. रिमा लागू सखींना म्हणाल्या होत्या की, ‘महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे. या ताकदीचा आपण वापर केला पाहिजे. नुसत्या रडत बसू नका. आपल्यात जी क्षमता आहे, जी पुरु षात आहे. तेव्हा परिस्थितीला आणि इतरांना दोष देऊ नका. कुणाकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वत:च्या पंखांना स्वत:च बळ द्यायला हवे आणि खंबिरपणे उभे राहायला हवे.’  त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाला सखींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली होती.  त्यांच्या या प्रेरणेने आज अनेक सखी स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज रिमा लागू यांच्या निधनाचे वृत्त समजताच सखींना धक्का बसला. त्यांनी दिलेला कानमंत्र आठवला आणि हळहळ व्यक्त केली. ‘लोकमत’ सखी मंचच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळतं, याचा रिमा लागू यांना खूप आनंदही झाला होता. विशेष म्हणजे रिमा लागू यांनी त्यावेळी जळगावचे प्रसिद्ध भरीत, भाकरी, ठेचा आणि शेवभाजीचाही आस्वाद घेतला होता.  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे जळगावातील गृहिणी विशाखा देशमुख यांनी सांगितले. रंगभूमीवर त्यांचा सहज वावर होता. अनेक आव्हानात्मक भूमिका त्यांनी साकारल्या. आईची भूमिका तर सवरेत्कृष्ट होती. 12 वर्षापूर्वी त्या लोकमत सखी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सखींशी साधलेला संवाद आजही स्मरणात असल्याचे विशाखा देशमुख म्हणाल्या.