शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बंदमुळे पाचोरा झाले ठप्प

By admin | Updated: February 3, 2017 00:53 IST

प्रवाशांची झाली गैरसोय : विविध शुल्कवाढीविरुद्ध युनियनचे आंदोलन

पाचोरा : जाचक शुल्कवाढीविरुद्ध पाचोरा येथे रिक्षाचालकांनी कडकडीत बंद पाळला. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. शहर जणू ठप्प झाले होते.राज्य परिवहन विभागाने वाहतूकदारांवर अन्यायकारक वाढीव शुल्क व दंड आकारणी सुरू केली आहे. ती रद्द करावी तसेच रिक्षा पासिंग तालुकास्तरावर कॅम्पच्या दिवशीच व्हावी या मागण्या पाचोरा एकता ऑटो रिक्षाचालक - मालक युनियनने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना हे निवेदन मोर्चाद्वारे तहसील कचेरीत जाऊन दिले असून निवेदनाद्वारे  कळविल्या आहेत.  निवेदनात नमूद केले  आहे की,  ग्रामीण भागात ऑटो रिक्षा चालवून परिवाराची उपजीविका भागवतो. रिक्षाचालकास नियमित रिक्षा पासिंगसाठी त्या दिवसाचा व्यवसाय बंदच ठेवून जळगाव येथे जावे लागते. यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. परिवहन विभागातर्फे उशिराने गाडी पासिंग करणा:यांना दिवसागणिक 50 चा दंड आकारणीचा नियम लागू करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने वाढवलेल्या 15 पट आकारणी शुल्कामुळे रिक्षा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले  आहे. आकारलेला शुल्क व रोजचा रु.50 चा दंड रद्द करण्यात यावा, तसेच तालुकास्तरावरील कॅम्पमध्येच रिक्षा पासिंग करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांचा विचार न झाल्यास पुढे बेमुदत रिक्षा बंद आंदोलन केले जाईल व  आरटीओ विभागाला तालुका प्रवेश बंदी केली जाईल, असा इशाराच एकता ऑटो रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे. निवेदनावर एकता ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ संदानशिव, उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिव अनिल लोंढे, सुधाकर महाजन, नाना चौधरी, अशोक निंबाळकर, गणेश पाटील आदींच्या सह्या आहेत.        (वार्ताहर)पाचोरा शहरात सुमारे 250 ऑटो रिक्षा असून शहरात रिक्षाची संख्या वाढल्याने साहजिकच आता व्यवसायिक स्पर्धा वाढली आहे. यामुळे आता दररोज 100 ते 150 रु व्यवसायसुद्धा होत नाही. त्यात  परिवहन विभागाचे नवीन नियम रिक्षाचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. हा व्यवसाय आता अगदीच न परवडणारा ठरणार आहे.रिक्षा पासिंग करताना दिवसागणिक 50 रुपये दंड आकारणी रद्द करावी तसेच रिक्षा पासिंग तालुकास्तरावर कॅम्पच्या दिवशीच व्हावी या मागणीसाठी पाचोरा एकता ऑटो रिक्षाचालक - मालक युनियनने एक दिवस ऑटो रिक्षा बंद ठेवून या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तालुकास्तरावरील कॅम्पमध्येच रिक्षा पासिंग करण्यात यावी, या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने पाचोरा येथील रिक्षा बेमुदत बंद आंदोलन करून आरटीओ विभागाला तालुका प्रवेशबंदी करू.-एकनाथ हरी संदानशिव,एकता ऑटो रिक्षा युनियन पाचोरा अध्यक्ष