शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मेटॅडोअरचा धक्क्याने रिक्षा पुलावरुन कोसळली

By admin | Updated: January 6, 2017 01:21 IST

महामार्गावरील पिंप्राळा उड्डाणपुलावरील घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावले रिक्षा चालक व सहकारी

जळगाव : भरधाव वेगाने मागून येणा:या मॅटेडोअरचा कट लागल्याने मालवाहू रिक्षा थेट उड्डाणपुलावरुन शंभर ते दीडशे फुट खाली कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळा पुलाजवळ घडली.या अपघातात सात ते आठ पलटी घेतल्याने रिक्षाचे दोन तुकडे झाले. दैव बलवत्तर म्हणून रिक्षा चालक व त्याचा सहकारी बालंबाल बचावले. मॅटेडोअर चालकाने रस्त्याने येताना दोन ते तीन वाहनाना कट मारला होता, त्यामुळे तो या अपघाताच्या वेळी तेथे न थांबता पसार झाला.गणेश कॉलनीतील पालीवाल टेन्ट हाऊसची रिक्षा (क्र.एम.एच.19 एस.0884) घेवून चालक कैलास दामू सावळे (रा.हुडको, पिंप्राळा)व त्याचा सहकारी अनिल शिरसाठ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर असलेल्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातील टेन्ट हाऊसचे साहित्य घ्यायला गेले होते. तेथून परत गणेश कॉलनीत येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर पिंप्राळा पुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणा:या मेटॅडोअरचा कट लागला, त्यात रिक्षा थेट पलटी घेत खाली कोसळली. पलटी घेत असताना कैलास व अनिल या दोघांनी जीव मुठीत घेवून स्वत:ला सावरले. झाडाझुडपांमध्ये अंगावर दगड व काटे लागले.  रिक्षाचा पुढील भाग व ट्रॉली तुटून वेगळी झाली. त्यात तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.बालंबाल बचावले दोघंया अपघातात चालक कैलास याच्या पायाला मुका मार लागला आहे तर अनिलला किरकोळ दुखापत झाली.दोन्ही बालंबाल बचावले आहे. तसेच खालच्या रस्त्यावर सुदैवाने त्यावेळी एकही वाहन अथवा व्यक्ती रस्त्यावरुन वापरत नव्हता, अन्यथा त्यांच्या अंगावरच रिक्षा आली असती व मोठी घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच रिक्षा व टेन्ट हाऊचे मालक नंदू पालीवाल, माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील, केतन पाटील यांनी घटनास्थळ गाठून चालकाला दवाखान्यात हलविले. वाहतुकीचा खोळंबा महामार्गावर व पिंप्राळा रस्त्याला लागून महामार्गाला जोडणा:या रस्त्यावर वाहतुकीची खोळंबा झाला होता. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे बीट मार्शल रवी तायडे व मनोज कोळी यांनी घटनास्थळ गाठून वाहतुक सुरळीत केली व अपघातग्रस्त रिक्षा इतरत्र हलविली. दरम्यान, महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बुधवारी वराड गावाजवळ भरधाव वेगाने जाणा:या ट्रकने विद्यार्थिनीचा बळी घेतला होता. त्यानंतर दुस:याच दिवशी हा अपघात झाला.