शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 370 गावांची सुधारीत हंगामी पैसेवारी 50 पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:07 IST

तीन तालुक्यातील सर्व गावे 50 पैशांच्या आत : उर्वरित 1132 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर

ठळक मुद्देतीन तालुक्यातील सर्व गावे 50 पैशांच्या आतसात तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यातील 1502 गावांची सुधारीत हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात 370 गावांची   पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर 1132 गावांची पैसेवारी  50पैशांच्या वर आहे. यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळा झाला. याउलट जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला.  त्यानुसार यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी प्रशासनाने नजर पैसेवारी जाहीर केली होती. त्यात 1467 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर होती तर उर्वरित गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत होती. 

तीन तालुक्यातील सर्व गावे 50 पैशांच्या आत31 ऑक्टोबर रोजी प्रशासनाने खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर केली. त्यात अमळनेर तालुक्यातील 154 पैकी 154, मुक्ताईनगर तालुक्यातील 81 पैकी 81, बोदवड तालुक्यातील 51 पैकी 51 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे. पारोळा तालुक्यातील 114 पैकी 35, यावल 84 पैकी 3, चाळीसगाव तालुक्यातील 136 पैकी 46 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे. 

सात तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावरसात तालुक्यांधील सर्वचे सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावर आहे. यामध्ये जळगाव तालुक्यातील 92, जामनेर तालुक्यातील 152, भुसावळ 54, रावेर 121, पाचोरा 129, चोपडा तालुक्यातील 117 गावांमधील पैसेवारी 50 पैशांच्यावर आहे. पारोळा तालुक्यातील 79, यावल 81, भडगाव 63, चाळीसगाव तालुक्यातील 90 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर आहे.