शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या उत्पन्नाचा ताळेबंद देत मिळविला वजा उत्पन्नाचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:23 IST

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकºयाने आपल्या शेतातील उत्पन्नाला मिळणारा हमीभाव आणि त्याला आलेला खर्च याचा हिशोब सादर करीत तहसीलदारांकडून वजा उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे. या माध्यमातून शेती परवडत नसल्याचे सिद्ध होऊ पाहत आहे.

ठळक मुद्देहिरालाल केशव पाटील यांनी केली वजा उत्पन्नाच्या दाखल्याची मागणीआॅनलाईन दाखला देण्याच्या सिस्टीममध्ये असा दाखला देण्याची तरतूद नसल्याने सुरुवातीला फेटाळली मागणीशेतकºयाने हिशोब सादर केल्यानंतर तहसीलदारांनी स्वतंत्र पत्र देत दिला वजा उत्पन्नाचा दाखलाउत्पन्नाच्या दाखल्यावर कोणताही लाभ देता येणार नसल्याचे तहसीलदारांनी केले स्पष्ट

संजय पाटील /आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.४ - तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकरी हिरालाल पाटील यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या शेतमालाला शासनाकडून मिळणारा हमीभाव आणि त्यासाठी आलेला खर्च तहसीलदारांकडे सादर करीत वजा उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे.मंगरूळ येथील शेतकरी हिरालाल केशव पाटील यांनी शेत मालाला शासनाचा हमी भाव आणि त्यानुसार विकलेला माल आणि त्यांनी शेतीवर केलेल्या बियाणे , खत , मजुरी आदी खचार्चा हिशोब पावत्यांसह केला असता त्यांना मिळालेल्या शेतमाला पासूनचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने वजा उत्पनाचा दाखला मिळावा म्हणून तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र वजा उत्पनाचा दाखला देण्याची तरतूद नाही व आॅनलाईन सॉफ्टवेअर मध्ये ही तशी व्यवस्था नसल्याने असा दाखला देता येणार नाही म्हणून तहसीलदारांनी नकार देण्यात आला होता. मात्र शेतकरी मागणीवर ठाम होते त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन १ लाख ९६ हजार ६६७ रुपयांचा वजा उत्पन्नाचा दाखला मिळावा म्हणून पाठपुरावा केला. अखेर तहसीलदारांनी प्रतिज्ञापत्र व पावत्या ग्राह्य धरून आॅनलाईन दाखला देता येत नसल्याने स्वतंत्र पत्र देऊन वजा उत्पन्नाचा दाखला दिला आहे. यावरून शासनाच्या ठरवलेल्या हमीभावावरून शेती परवडत नसल्याचे शासकीय कागदोपत्री सिद्ध झाले आहेवजा उत्पन्नाच्या आधारावर हिरालाल पाटील शासनाकडे विविध लाभाची मागणी करणार आहेत. मात्र उत्पन्न दाखल्यावर कोणताही लाभ देता येणार नाही असे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.