शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त सैनिकाने शाळेला दिला संगणक संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या सावखेडा बुद्रुक गावी नुकतेच १७ वर्षांच्या देशसेवेनंतर भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या ...

वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या सावखेडा बुद्रुक गावी नुकतेच १७ वर्षांच्या देशसेवेनंतर भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परतलेल्या जगदीश गोविंदा परदेशी यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिरास दोन संगणक संच व प्रिंटर भेट दिले आहेत.

त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावातून आपली मिरवणूक काढून गाजावाजा न करता मिरवणुकीसाठी व अन्नदानासाठी येणारा खर्च न करता हा खर्च सत्कारणी लावण्याच्या हेतूने आपल्या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या लहान चिमुकल्यांना प्राथमिक स्तरापासूनच डिजिटल तंत्रज्ञानाच्या दृष्टीने संगणकीय ज्ञान अवगत व्हावे व ते या अत्याधुनिक युगातील स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत, या हेतूने १ लाख रुपयांपर्यंत खर्च करून शाळेसाठी चार संगणक संच भेट देण्याचा मानस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर परदेशी व मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांच्याजवळ व्यक्त केला होता. परंतु मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांनी त्यांना सांगितले की, आमच्या शाळेत आम्ही फक्त दोनच शिक्षिका नियुक्त आहोत. त्यामुळे आम्हांला चार संगणक नकोत. त्याऐवजी सोबत प्रिंटर द्यावे म्हणून आपण आम्हांला फक्त दोन संगणक संच व प्रिंटर द्यावे, असे सुचविले.

त्याप्रमाणे सेवानिवृत्त आर्मी जवान यांनी १५ ऑगस्ट रोजी सरपंच सुमन वाघ, उपसरपंच राजेश सोनवणे, पोलीस पाटील ज्योती परदेशी, अंगणवाडी सेविका नंदा परदेशी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्षा आशा पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर परदेशी यांना हे संगणक संच व प्रिंटर सुपुर्द केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षिका सुषमा गोसावी यांनी मानले.

160821\img_20210815_074154.jpg

सेवानिवृत्त भारतीय सैनिक जगदीश गोविंदा परदेशी हे शाळेला संगणक संच भेट देतांना. सोबत उपस्थित मान्यवर