शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलवर रेमडेसिविरच्या विक्रीला निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने कोविड संदर्भात बुध‌वारी नवे आदेश पारित केले आहेत. त्यात कोविड रुग्णालयाने रुग्णाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने कोविड संदर्भात बुध‌वारी नवे आदेश पारित केले आहेत. त्यात कोविड रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिविर प्रिस्क्रिपशन देण्याऐवजी आपल्याशी संलग्न असलेल्या मेडिकल शॉपमधून थेट वायल्स घेऊन रुग्णास द्यावे आणि त्या औषधाचे बिल हे रुग्णाच्या शेवटच्या बिलात समाविष्ट करावे, कोविड रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलने काऊंटरवर त्याची विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे. की, रुग्णालयाने जेवढे वायल्स संलग्न मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर करावा. शासनाने निश्चित केलेल्या सहपत्रात भरून त्याच्या दोन प्रती सांभाळून ठेवाव्या. तसेच प्रत्येक रुग्णाच्या रिकाम्या वायल्स जपून ठेवाव्या. मेडिकलमधील वायल्सची रुग्णांच्या तुलनेत संख्या कमी असेल तर अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.

कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधाची किंमतही शासनमान्य दरानेच करावी. काही कारणाने रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस पूर्ण दिला गेला नाही तर उर्वरित साठा मेडिकल स्टोअर्सला परत करावा.

या आदेशात म्हटले आहे की, रुग्णालयांनी कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या आधी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कोविड हॉस्पिटल म्हणून नोंदणी करावी. तसेच त्याची माहिती दररोज जळगाव जिल्ह्याच्या डॅशबोर्डवर भरावी. रेमडेसिविरची मागणी ही तीन दिवस पुरेल एवढीच करावी. घाऊक औषध विक्रेत्यांनी सी ॲण्ड एफ एजंट यांनी कागदपत्रे शहानिशा केल्यानंतरच संबंधित रुग्णालयाच्या मागणी प्रमाणे औषध पुरवठा करावा. ज्या रुग्णालयांना संलग्न मेडिकल नाही. त्यांनी रेमडेसिविरची खरेदी ही घाऊक औषध विक्रेते यांच्याकडून करावी. असे आदेश देण्यात आले आहेत.