शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्तीची जबाबदारी सर्वांची, अमळनेर येथे कचरा व्यवस्थापन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:36 IST

अमळनेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर व्हावे यासाठी नगरपपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन इंदिरा गांधी ...

अमळनेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर व्हावे यासाठी नगरपपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन इंदिरा गांधी भवन येथे ३० जून रोेजी करण्यात आले. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी विघटनशील व अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. याअंतर्गत अमळनेर शहर स्वच्छ व कचरामुक्त करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. यासाठी पालिकेला त्यात सातत्य टिकविणे आवश्यक असल्याचे बाविस्कर म्हणाल्या. पर्यावरणाचा -हास होऊ नये याकरिता कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद केला असून शहर प्लास्टीकमुक्त घोषीत केले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या व्यावसायिक, नागरिकांना दंड करण्यात आलेला आहे. मात्र, काही दुकानदार ५० मॅक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या विकताना दिसत आहेत. अशा दुकानदारांनी प्लास्टीक पिशव्या आपल्याजवळ बाळगू नयेत, तसेच दुकानातून निर्माण होणारा कचरा कुठेही उघड्यावर टाकू नये. शहर कचरामुक्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, ेअसे त्या म्हणाल्या.सूत्रसंचालन युवराज चव्हाण यांनी केले. विद्युत पर्यवेक्षक प्रशांत ठाकूर, आरोग्य निरीक्षक संतोष बि-हाडे, अरविंद कदम, अनिल बेडवाल, शहर समन्वयक गणेश गढरी, विजय सपकाळे, फय्याज शेख, कु.जया सरदार, समाधान बच्छाव, मच्ंिछद्र संदानशिव आदी उपस्थित होते. यावेळी संतोष बि-हाडे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.