ममुराबाद : परिसरातील धामणगाव येथे माय माती फाऊंडेशनतर्फे ‘माझे झाड माझी सावली’ या उपक्रमांतर्गत गावातील महिलांनी प्राथमिक शाळेलगत वृक्षारोपण केले. विशेष म्हणजे प्रत्येक महिलेकडे तिच्या स्वतःच्या नावाचा फलक बनवून रोपटे जोपासण्याची जबाबदारी देण्यात आली.
याशिवाय प्रत्येक झाडावर गावातील नागरिकांचे नाव देऊन त्यांच्या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकाने त्या झाडाची काळजी घेऊन निगा राखावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी धामणगावचे उद्योगपती अनिल मंडोरे, धामणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे, प्राथमिक शाळेचे शिक्षक साळुंके, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लोकमित्र फाऊंडेशनचे शेखर वैद्य व समृद्धी वैद्य उपस्थित होते. माय माती फाऊंडेशनच्या संस्थापक प्रभावती पाटील व सुहास पाटील यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
---------------------------
फोटो क्रमांक १५ सीटीआर ०३
धामणगाव येथे माय माती फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना महिला.