शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

जळगाव जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ २० वाळू गटांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:25 IST

शासनाला मिळणार १३ कोटी २७ लाखांचा महसूल

ठळक मुद्देएकाच व्यक्तीच्या नावाने गेले ९ ठेकेई-निविदा व ई-लिलाव या दोन्ही पद्धतींचा अवलंब करीत त्यातून सर्वाधिक बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता महामार्गापासून जवळ २० गटांना प्रतिसाद

जळगाव: जिल्ह्यातील ४९ वाळू गटांचा ठेका देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ई-निविदा व ई-लिलाव या दोन्ही पद्धतींचा अवलंब करीत त्यातून सर्वाधिक बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता देण्याची पद्धत अवलंबली होती. त्यानुसार गुरूवारी ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीच्या दरांचा तुलनात्मक तत्कार करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यात ४० पैकी केवळ २० गटांनाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून एकूण १३ कोटी २६ लाख ५३ हजार३४१ रूपयांचा महसूल यातून शासनाला मिळणार आहे. जिल्ह्यातील ४९ वाळू गटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने मक्ता दिला जाणार असल्याने ई-निविदेसाठी सोमवार, २७ रोजी शेवटची मुदत होती. ई-लिलावातील बोली व ई-निविदेत आलेली बोली याचा तुलनात्मक तक्ता करून जादा बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता दिला जाणार होता. त्यानुसार १४ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र त्यास मक्तेदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. जेमतेम १२ ते १५ मक्तेदारांनीच आॅनलाईन नोंदणी केली. तसेच याच कालावधीत आॅनलाईन ‘ई-निविदा’ सादर करावयाची होती. त्यानुसार ‘ई-निविदांची’ मुदत सोमवारी संपली.  ‘ई-लिलाव’ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात झाला. या ई-निविदा व ई-लिलाव यांच्यात प्रत्येक गटासाठी लावण्यात आलेल्या बोलीचा तुलनात्मक तक्ता तयार करून सर्वाधिक बोली बोललेल्या मक्तेदारांना मक्ता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.महामार्गापासून जवळ २० गटांना प्रतिसाद४९ वाळू गटांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र जेमतेम २० वाळू गटांनाच मक्तेदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यातही राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून या चौपदरीकरणासाठी संबंधीत मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात वाळूची गरज भासणार आहे. हा मोठा ग्राहक डोळ्यासमोर ठेवत महामार्गापासून जवळ असलेल्या वाळू गटांना मक्तेदारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.नवीन ठेकेदारांचा उदय?वाळू ठेके घेणारे काही ठराविक लोकच दरवर्षी ठेका घेण्यासाठी येत असतात. मात्र यंदा मागील वर्षीच्या ठेकेदारांपैकी केवळ एकाच ठेकेदाराचे नाव या २० ठेके घेणाºयांमध्ये दिसून येत आहे. तर राजेंद्र मोहनलाल जैन नामक एकाच व्यक्तीने ९ ठेके घेतल्याचे समजते. त्यामुळे आधीच्या ठेकेदारांचे दर कमी असल्याने ते बाद झाले की त्यांनीच एमपीडीएच्या धाकाने अन्य व्यक्तीच्या नावाने ठेके घेतले? याबाबत उत्सुकता कायम आहे.बोली आलेले वाळू गटनांदेड भाग १ (धरणगाव, तापी नदी), टाकरखेडा (एरंडोल, गिरणा नदी), वैजनाथ (एरंडोल, गिरणा), दोनगाव खु. (धरणगाव, गिरणा), बेलव्हाय १ (भुसावळ, वाघूर नदी), बेलव्हाय २ (भुसावळ, वाघूर), बेलव्हाय ३ (भुसावळ, वाघूर), गोभी (भुसावळ, वाघूर), सुनसगाव (भुसावळ, वाघूर),भानखेडे (भुसावळ, तापी), जोगलखेडे (भुसावळ, वाघूर), पिंप्रीनांदु (मुक्ताईनगर, तापी), पथराड (यावल, तापी), शिरागड १ (यावल, तापी), शिरागड २ (यावल, तापी), कुरंगी (पाचोरा, गिरणा), खापरखेडे प्र.ज. (अमळनेर, तापी), कोळंबा (चोपडा, तापी), कुरवेल (चोपडा, तापी), भऊर  (चाळीसगाव, गिरणा)सर्वाधिक बोली दोनगाव खु. गटालाया २० वाळू गटांपैकी देखील ८०४६ ब्रास वाळूसाठा असलेल्या दोनगाव खु. वाळू गटाला सर्वाधिक ३ कोटी १५ लाख ९३ हजार १८८ रूपयांची बोली मिळाली. त्यापाठोपाठ ६३०७ ब्रास वाळूसाठा असलेल्या नांदेड भाग १ वाळू गटाला २ कोटी १० लाखाची सर्वाधिक बोली लागली. २०७८ ब्रास वाळूसाठा असलेल्या वैजनाथ वाळूगटाला १ कोटी ९० लाख १० हजार रूपयांची बोली मिळाली. तर ३५६२ ब्रास वाळूसाठा असलेल्या खापरखेडे प्र.ज. वाळूगटाला १ कोटी ८१ लाखांची तर त्यापाठोपाठ ३५६२ ब्रासच वाळू साठा असलेल्या कुरंगी वाळू गटाला १ कोटी २१ लाखांची बोली मिळाली. उर्वरीत वाळू गटांना लाखांमध्ये बोली लागली. यातून एकूण १३ कोटी २६ लख ५३ हजार ३४१ रूपयांचा महसूल शासनाला मिळणार आहे.