शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविणार - डॉ. प्रताप जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 11:14 IST

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर प्रथमच जळगावला संधी

ठळक मुद्दे1993 पासून जळगावात रुग्ण सेवासामाजिक कार्यात योगदानसामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर संधी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 5 -  वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेले जाचक नियम, अटी व त्या बाबत डॉक्टरांना वेठीस धरले जाते ते प्रश्न  मार्गी लावण्यासाठी अविरत काम सुरू ठेवू, अशी ग्वाही  प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सोबतच जळगावला ही प्रथमच संधी मिळाल्याने खान्देशातील डॉक्टरांच्या समस्या, अडीअडचणी संवेदनशीलतेने सोडवू असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. डॉ. जाधव यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचीत केली. त्यावेळी त्यांनी आपला मनोदय  व्यक्त केला. डॉ.प्रताप जाधव हे  मूळचे फुपनगरी, ता.जळगाव येथील रहिवासी असलेले  डॉ. जाधव यांनी  यांनी 1989 मध्ये एम.एस.आर्थोची पदवी मिळवली. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी जळगावात रुग्ण सेवा सुरू केली. सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.वैद्यकीय सेवेसह डॉ. जाधव यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान आहे. जळगाव जनता बॅँकेच्या उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेवरही त्यांनी काम केले आहे. तसेच जळगावात मतीमंद मुलांसाठी असलेल्या ‘आश्रय माङो घर’ या उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. काय आहे कौन्सिलचे काम?अॅलोपॅथीची पात्रता मिळविलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलवर नोंदणी होते.त्यानंतर डॉक्टरला क्रमांक मिळतो.तेव्हाच डॉक्टर अधिकृतपणे प्रॅक्टीस करु शकतो. डॉक्टरांसाठी कौन्सिलने नियमावलीची आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. त्याचे डॉक्टर पालन करतात की नाही हे तपासण्याचे काम समिती करते.