शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करूच असा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीने आपल्याला जखडून ठेवले आहे. विकासात्मक कामे करण्यास कोरोना वेळ देत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना महामारीने आपल्याला जखडून ठेवले आहे. विकासात्मक कामे करण्यास कोरोना वेळ देत नाही. कोरोनाने आपल्या अनेक स्वजनांना हिरावून घेतले आहे. त्याला आता आपण हरविले नाही तर आपल्या पुढील पिढ्यांना तो त्रासदायक ठरेल. यामुळे कोरोनाशी दोन हात करून त्याला कायमचा हद्दपार करा. कोरोना मुक्तीची चळवळ तयार करून गावासह जिल्ह्याला, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

कोरोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत त्यांनी सोमवारी नाशिक विभागातील कोरोनामुक्त गावांच्या सरपंचाशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा विज्ञान व सुचना कार्यालयातून पहूरपेठ (ता. जामनेर) येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, सारोळा खुर्दचे (ता. पाचोरा) सरपंच सीमा पाटील, विरावाडे (मालापूर) (ता. चोपडा) येथील विशाल म्हाळके, मालोद (ता .यावल) येथील हसीना सिराज तडवी हे जिल्ह्यातील चार सरपंच व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, यावल पंचायत समितीचे एच.एम.तडवी उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हेही सहभागी झाले होते.

१०७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त...

कोरोना महामारीला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील १ हजार १५७ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ०७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे या गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.

१२०० कुटूंबांना अन्नधान्य देण्याची केली व्यवस्था

पहूरपेठ (ता. जामनेर) येथील सरपंच नीता पाटील यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या म्हणाल्या, की गावातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच प्रतिबंधात्मक उपाययोजना गावात आखल्या गेल्या. सॅनिटायझेशनचा वापर, मास्कचा वापर अनिवार्य केला. स्वच्छता पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून कोरोनाला रोखण्याचे काम केले. संचारबंदी असल्याने १२०० कुटूंबांना अन्नधान्य देण्याची व्यवस्था लोकसहभागातून केली, असे त्यांनी सांगितले.