शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग.स.अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:04 IST

जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदिवाळीनंतर ठरणार  नवीन अध्यक्ष भुसावळच्या इमारत उद्घाटनासाठी घेतला निर्णयबोरोलेंच्या कार्यकाळात भुसावळच्या इमारतीचे काम

आॅनलाईन लोकमत 

जळगाव, दि.२-जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, भुसावळ येथील ग.स.सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर राजीनामे स्विकारले जाणार असल्याची माहिती ग.स.मधील सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

ग.स.सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील यांचा एक वर्षाचा कार्यकाळ २ आॅक्टोबर रोजी संपला. त्यानिमित्त रविवारी ग.स.सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सहकार पॅनलचे प्रमुख बी.बी.पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द  केल्याची माहिती मिळाली. यावृत्तास बी.बी. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

बोरोलेंच्या कार्यकाळात भुसावळच्या इमारतीचे कामअध्यक्ष तुकाराम बोरोले यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात भुसावळ येथील ग.स.सोसायटीच्या कार्यालयाचे काम झाले आहे. तसेच या इमारतीचे उद्घाटन  आठवड्याभरात होणार आहे. त्यामुळे बोरोले यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या इमारतीचे उदघाटन देखील त्यांच्याच कार्यकाळात व्हावे असे मत बी.बी.पाटील यांनी रविवारच्या बैठकीत व्यक्त केले. त्यांच्या मताला उपस्थित संचालक मंडळाकडून देखील पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. 

इन्फो-उद्घाटनावेळी स्विकारले जातील राजीनामेयेत्या आठवड्याभरात भुसावळ येथील इमारतीचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी ग.स.अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे स्विकारले जाणार आहेत. मात्र नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ही दिवाळीनंतरच होणार आहे. २२ आॅक्टोबर रोजी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. 

कोट..अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाळ २ आॅक्टोबरला संपल्यामुळे त्यांनी रविवारी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले. मात्र ते राजीनामे स्विकारण्यात आले नाहीत. येत्या आठ दिवसात  ते राजीनामे मंजूर करण्यात येतील.-बी.बी.पाटील, सहकार पॅनल प्र्रमुख