शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या थकबाकीदारांमध्ये मातब्बर मंडळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 11:22 IST

जगवानी, खटोड, आमदारांच्या बंधूचा समावेश

ठळक मुद्देखटोड कुटूंबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी

्र्रजळगाव : मनपा प्रशासनाने चौकाचौकात लावलेल्या बड्या थकबाकीदारांच्या याद्यांमध्ये शहरातील मातब्बर व्यक्तींचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी, माजी नगराध्यक्ष पांडूरंग काळे, आमदार चंदूलाल पटेल यांचे बंधू देवराम पटेल, बांधकाम व्यवसायीक श्रीराम खटोड यांचा समावेश असून, या सर्व थकबाकीदारांना मनपा प्रशासनाने जप्तीची नोटीस बजावली आहे.मनपा प्रशासनाकडे वसुलीसाठी आता केवळ दोन महिन्यांचा काळ शिल्लक असून, मनपाने आता वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने चारही प्रभागांमध्ये प्रत्येकी १०० अशा एकूण ४०० बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी चौकाचौकात प्रसिध्द केली आहे. तसेच या सर्व थकबाकीदारांच्या घरी जप्तीची नोटीस पाठवून थकीत रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्यांचा मालमत्तांवर बोजा देखील बसविण्यात येणार आहे.मनपाकडून कारवाईची अपेक्षामनपाकडून बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी लावण्यात आली असली तरी या मनपाने जप्तीची नोटीस बजावल्याव्यतिरीक्त कारवाईबाबत कोणतेही नियोजन नाही. दरवर्षी मनपाकडून या थकबाकीदारांना जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठवल्या जातात. मात्र, मनपाची वसुली समाधानकारक झाली की या थकबाकीदारांवर कुठलीही कारवाई ही केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाईसाठी हिंमत दाखवणारे मनपा प्रशासन या बड्या व्यक्तींवर कारवाई करण्यास धजावेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. याबाबत मनपा उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना विचारले असता, मनपाची थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. थकबाकीदार थकबाकी भरतात की मनपा कारवाई करते याकडे आता लक्ष लागून आहे.माजी आमदार व आमदारांचे बंधूही थकबाकीदारबड्या थकबाकीदारांमध्ये माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी व आमदार चंदुलाल पटेल यांचे बंधू देवराम पटेल यांचा देखील समावेश आहे. गुरुमुख जगवानी यांच्याकडे १ लाख २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ९० हजार रुपयांची थकबाकी ही गेल्यावर्षीची आहे. देवराम पटेल यांच्याकडे देखील ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यासह माजी नगराध्यक्ष पांडूरंग काळे यांच्याकडे ५९ हजार रुपयांची थकबाकी आहे.खटोड कुटूंबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी४शहरातील मोठे बांधकाम व्यवसायिक असलेले श्रीराम खटोड यांच्या कुटंूबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी आहे. श्रीराम खटोड यांच्याकडे १ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ५६ हजार रुपयांची वसुली ही चालु वर्षातील तर उर्वरित थकबाकी ही गेल्यावर्षाची आहे. तसेच सुधा श्रीकांत खटोड यांच्याकडे १ लाख ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ९९ हजार रुपयांची थकबाकी ही या वर्षाची तर ७९ हजार रुपयांची थकबाकी ही गेल्यावर्षींची असल्याचे मनपातर्फे लावण्यात फलकावर नमूद करण्यात आले आहे.