शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात चालता फिरता रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:15 IST

पाचोरा येथील खासगी दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरातील अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. चालता फिरता आलेल्या निवृत्तीचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करुन डॉक्टरांवरच आरोप केले.

ठळक मुद्दे अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमधील प्रकार   तपासणीसाठी आणले अन् दाखल केले डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २८ : पाचोरा येथील खासगी दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरातील अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. चालता फिरता आलेल्या निवृत्तीचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करुन डॉक्टरांवरच आरोप केले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्ती पाटील या तरुणाचा आठ दिवसापूर्वी कुºहा-जामनेर रस्त्यावर अपघात झाला होता. दुचाकीवरुन घसल्याने डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी निवृत्ती याची त्या दवाखान्यातून सुटका झाली. डोक्याला मार लागल्याने जळगावात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊ म्हणून नातेवाईकांनी निवृत्ती याला मंगळवारी सायंकाळी महामार्गाला लागून असलेल्या डॉ.निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निवृत्तीला अतिदक्षता विभागात ठेवण्याचा सल्ला दिला. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती पाटील या तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते, मात्र डॉक्टर निलेश किनगे यांना बाहेरगावी काम असल्याने ते निघून गेले. बुधवारी ते हॉस्पिटलमध्ये नव्हते. साडे पाच वाजता डॉ.संजीव हुजूरबजार यांनी रुग्णाची तपासणी केली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता पत्नी मायाबाई ही अतिदक्षता विभागात गेली असता निवृत्तीचे ह्दय बंद पडले होते.