शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात ग्रा.पं.आखाड्यात सरपंच पदासाठी प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:56 IST

जळगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देडिजीटल प्रचारावर भर ७ आॅक्टोबर रोजी मतदानमंगळवारपासून प्रचाराची रंगत

आॅनलाईन लोकमत ,  अजय पाटील

जळगाव, दि.२-तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील सावखेडा खु. येथील सरपंच व सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. तर वराड बु. येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९ गावांमध्ये सरपंच पदासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. 

किनोद येथे फक्त सरपंचपदासाठी मतदान होणारकिनोद ग्रामपंचायतीच्या आठ जागा या बिनविरोध झाल्या आहेत. या ठिकाणी केवळ सरपंच पदासाठी  मतदान होणार असून,  प्रियंका प्रवीण सूर्यवंशी व सुमाबाई सुनील चौधरी यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले असून, गावात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार एकाच समाजातील असल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर खरी मदार असल्याचीमाहितीमिळाली.

भादली खु.येथे ५ जागांसाठी होणार मतदानसात पैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५ जागांसाठी ७ आॅक्टोबरला मतदान  होणार आहे. सरपंच पदासाठी एस.टी.प्रवर्गाची जागा राखीव होती. मात्र यासाठी गावात कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल नसल्याने सरपंच पदासाठी निवडणूक होणार नाही.  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत हिंमत पाटील व शेतकी संघाचे संचालक नाना आत्माराम पाटील या दोघांमध्ये अती-तटीची लढत आहे. या लढतीवर सर्व तालुक्याची नजर आहे. 

वसंतवाडी येथे 5 जागांसाठी मतदानयेथील ग्रामपंचायतीच्या १० जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये ४ सदस्यांचा समावेश आहे. तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून यामध्ये  वत्सलाबाई आधार पाटील व  दुर्गाबाई भिका चव्हाण या महिला उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. 

जळकेग्रामपंचायतीच्या ७ पैकी ६ जागाबिनविरोध झाल्या आहेत.  एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहे. तर सरपंच पदासाठी सुमनबाई वामन मोरे व मुन्नीबाई अजीज तडवी यांच्या सरळ  रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून मंगळवारी प्रचाराचे नारळ फोडणार येणार आहे. 

इन्फो-मंगळवारपासून प्रचाराची रंगतग्राम पंचायतीच्या निवडणुका असल्या तरी या निवडणुकांमध्ये देखील  उमेदवारांकडून डिजीटल प्रचारावर भर दिला जात आहे. सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून अनेक व्हॉट्सअ‍ॅप गृप तयार करण्यात आले असून, त्याव्दारे आपला जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. तालुक्यातील कुवारखेडे, विदगाव, घार्डी, सुजदे-भोलाणे  या गावांमध्ये देखील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराने वातावरण तापू लागले आहे.