शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चिनावल येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानची प्रातिनिधिक दिंडी पंढरपूरला अखेर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:16 IST

खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून वैकुंठवासी दिगंबर महाराज पायी वारी दिंडी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.

ठळक मुद्दे श्रीराम मंदिरापासून तिसऱ्या तपपूर्तीच्या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडीचे झाले प्रस्थान दिंडी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात प्रस्थान

रावेर : तालुक्यातील चिनावल येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानच्या खानापूर येथून प्रस्थान होणाºया श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडीला शासनाने संत मुक्ताई पायी वारी दिंडी सोहळ्यासोबत प्रातिनिधिक स्वरूपात परवानगी दिल्याने, आज खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून वैकुंठवासी दिगंबर महाराज पायी वारी दिंडी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.यंदा या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्याचा हा तिसरा तपपूूर्ती सोहळा कोरोनाच्या अनलॉकमध्येही तोही मानाच्या संत मुक्ताई पायी वारीसोबत पार पडत असल्याचा वारकरी संप्रदायाने आत्मानंद व्यक्त केला.चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज यांनी रोवलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्याला ३५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे.हभप दुर्गादास महाराज खिरवडकर व दिंडी चालक विणेकरी हभप भगवंत महाराज यांच्या नेतृत्वाखाली टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात आज या पायी दिंडी वारी सोहळ्याचे खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून प्रस्थान झाले. या पायी वारी दिंडी सोहळ्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज वारकरी संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची या प्रस्थान सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली.श्रीराम मंदिरापासून थेट खानापूर बसथांब्यावर हा दिंडी सोहळा पोहचल्यावर खासगी वाहनाद्वारे हा दिंडी सोहळा चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज यांच्या समाधीस्थळाचे व हंबर्डी येथील हभप विठ्ठल महाराज यांच्या समाधीस्थळावर सुपूजन करून आदिशक्ती श्री संत मुक्ताई पायी वारी दिंडी सोहळ्याचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होणाºया दिंडीत ही प्रातिनिधिक दिंडी संम्मेलीत होणार आहे. वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे या पायी वारी दिंडी सोहळ्याची ध्वजपताका घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्यात रवाना झाले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर