शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी एका पक्षाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:57 IST

शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.

ठळक मुद्देभुसावळ येथील ३०-४० कार्यकर्तेही अडचणीत वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाने त्या पदाधिकाºयांची केली तपासणी

उत्तम काळेभुसावळ : शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र एका पक्षाच्या अध्यक्षाने कोरोनासंदर्भात शॉप दिले असतानाही वाढदिवस साजरा करून तब्बल ३० ते ३० कार्यकर्त्यांना अडचणींमध्ये आणले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.येथील एका पक्षाच्या अध्यक्षांचा २० रोजी वाढदिवस होता. मात्र त्या पदाधिकाऱ्यांनी १८ रोजी कोरोनासंदर्भात तपासणी करून स्वॅप तपासणीसाठी पाठवले होते. तरीही तपासणीनंतर संबंधित पदाधिकाºयाने परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी ४०-५० कार्यकर्ते जमा केले. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता वाढदिवस उत्साहात साजरा केला . वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने त्या पदाधिकाºयांची तपासणी केली असतानाही वाढदिवस करीत असताना त्याच्या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही.रात्रीच्या वेळेस परिसरात वाढदिवस साजरा झाल्यानंतर दुसºयाच दिवशी २१ रोजी त्या पदाधिकाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला व परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने २२ रोजी त्या कार्यक्रमात कोण, कोण सहभागी होते त्यांची चौकशी केली. छायाचित्रावरून तब्बल ३० ते ४० कार्यकर्त्यांची तपासणी करून त्यांचे स्वॅप तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात आली आहे.दरम्यान, शहरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच दोन ठिकाणी ओल्या पार्ट्या करण्यात आल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते. एका पार्टीमध्ये नगरसेवक, तर एका पार्टीत प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व त्यात वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाल्यामुळे नागरिक चकीत झाले आहेत.कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तब्बल १३ ते १४ पोलीस कर्मचाºयांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे, तर इतर योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे, अशी परिस्थिती असतानाही राजकीय पक्षांचे पदाधिकारी मात्र वाढदिवस व ओल्या पार्ट्या साजरे करत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ