शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदसर येथे टळली राईनपाड्याची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:45 IST

सरपंचांचा संयम : दोन महिला ताब्यात

धरणगाव/पथराड, जि.जळगाव : धरणगाव येथून जवळ असलेल्या चांदसर येथे ११ रोजी सकाळी अकराच्या सुमारास गावात मुले पळविणाऱ्या दोन महिला आल्याची वार्ता गावात वाºयासारखी पसरली. गावात शोधाशोध सुरु झाली. गावातील जमावाने त्या महिलांचा शोध घेतला व त्यांना धरुन ग्रामपंचायत कार्यालयात आणले. यावेळी सरपंच सचिन पवार यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करुन तत्काळ पोलिसांना पाचारण केले व पोलिसांनी त्या दोघा महिलांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता, त्या महिला मध्य प्रदेशातील असून, त्या पाळधी रेल्वे गेटजवळ झोपडीत वास्तव्यास असल्याचे व भंगार वेचून उदरनिर्वाह करीत असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत चांदसर ग्रामस्थांचा संयम सुटला असता तर या ठिकाणी राईनपाड्याची पुनरावृत्ती झाली असती, अशी चर्चा होती.चांदसर ग्रामस्थांचे गाºहाणे ऐकून घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या महिलांना पाळधी दूरक्षेत्र व धरणगाव पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले. या वेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि नीलिमा बिºहाडे यांनी चौकशी केली असता त्या दोघा महिला भीलखेडी, ता.कामठा, जि.खंडवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, त्यांनी आपले बिºहाड पाळधी येथील रेल्वेगेटजवळ थाटले आहे. परिसरात भंगार वेचून आपण आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती या महिलांनी दिली.त्यांचे आधारकार्ड तपासल्यानंतर या दोघा महिलांविरुद्ध १०९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली व त्यांना सोडण्यात आले. चांदसर ग्रामस्थांनी संयमाने कायद्याचा आधार घेऊन पोलिसांच्या ताब्यात महिलांना दिल्याबद्दल सरपंच सचिन पवार यांनी आभार मानले आहे, तर अशा अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता अज्ञात लोकांविषयी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.