शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सहा रस्त्यांची दिवाळीपूर्वीच नव्याने दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेल्या रस्त्यांची दिवाळीपूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेल्या रस्त्यांची दिवाळीपूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांनी त्रस्त असून, रस्ते मनपाच्या की बांधकाम विभागाच्या हद्दीत हा वाद प्रशासकीय पातळीवर सोडून आधी जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृह येथे शुक्रवारी सर्वच विभागांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, अमर जैन, नितीन बरडे यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महारेलचे अधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील सहा रस्त्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून धरला असून, याच वृत्ताची दखल घेत पालकमंत्र्यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे.

बैठकीत या विषयांवर झाली चर्चा

१. मनपाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या सहा रस्त्यांवरील अतिक्रमण मनपाने गणेश विसर्जनानंतर तीन दिवसांच्या आत काढण्यात यावे.

२. बांधकाम विभागाला या रस्त्यांवरील कामांसाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी शहरातील रस्त्यांची कामे रखडणार नाही याकडे काळजी घेण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

३. ६ रस्त्यांबाबत मनपाने बांधकाम विभागाला तातडीने नाहरकरत देण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

डीपीडीसीतून तीन कोटींचा निधी देणार

शहरातील सहा रस्त्यांवरील कामे तातडीने करणे गरजेचे असून, राज्य शासनाच्या व इतर तांत्रिक बाबींमध्ये अडकल्यास नागरिकांचा प्रश्न रखडू शकतो. त्यामुळे तातडीने डीपीडीसीतून तीन ते चार कोटींची तरतूद करून शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

शहरातील प्रमुख चौकांचे होणार सुशोभीकरण

या बैठकीला उपस्थित असलेले न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौकांचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच बहिणाबाई चौक, रिंगरोड चौक, टॉवर चौक, स्वातंत्र्य चौक आणि अन्य चौकांसाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावेत, आपण नगरविकास खात्याकडून यासाठी निधी मंजूर करून आणू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

आसोदा रेल्वे गेटचे काम बांधकाम विभागाकडे वर्ग करा

आसोदा येथील उड्डाणपुलासाठी राज्य सरकारने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी रेल्वे प्रशासनाने याचे काम आपल्याकडे घेतले आहे. हे काम पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. भोईटेनगर रेल्वे गेटसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी रेल्वे प्रशासनामुळे या दोन्ही गेटचे मूल्य आता वाढल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.