शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

राष्ट्रीय महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा

By admin | Updated: January 21, 2017 00:27 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश : भूसंपादनामुळे रेंगाळले चौपदरीकरण; ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत असून निरपराध नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्राधान्य आहे, मात्र भूसंपादनाचा विषय रेंगाळल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यास ऑक्टोबर महिना उजाडेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन महामार्गावरील खड्डे बुजविणे, साईडपट्टय़ांची दुरूस्ती अशी कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका:यांना दिले असल्याची माहिती  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा दौ:यावर आले असता पालकमंत्र्यांनी नूतन मराठा कॉम्प्लेक्समध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून        घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय महामार्गाबाबत मुंबईत घेतली तातडीची बैठकराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चेअरमन व अधिका:यांची मुंबईत गुरूवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात राज्यभरातील चौपदरीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मनपाकडून 100 कोटींची मागणीमहापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे व अन्य काही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे पिंप्राळा उड्डाणपूलाला जोडणारा रस्ता, शिवाजीनगर उड्डाणपूल, जळगाव ममुराबाद रस्ता, जळगाव पाचोरा तसेच धानोरा यासह विविध विकास कामांसाठी 100 कोटींच्या निधीची मागणी करणारे निवेदन दिले. आचारसंहिता संपल्यावर याप्रश्नी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.बदलीची मागणी योग्य-चंदुलाल पटेलआमदार चंदूलाल पटेल म्हणाले की, अधिका:यांच्या बदलीची मागणी आपल्या समक्ष झाली. ही मागणी योग्य आहे. मात्र या अधिका:यांचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यात असाही पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची नैसर्गिक न्याय तत्वानुसार बदली होणारच आहे. कायद्याचा वचक असावा-सुरेश भोळेसद्य स्थितीबाबत नागरिकांचा संताप आहे. कायद्याचा वचक असावा. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर उद्रेक होतो. त्यामुळे बदलीची मागणी योग्य आहे.  बदलीची मागणी आपल्या समक्ष झाली असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे.  ‘नॅशनल हायवे’च्या नावाने जागेचा 7/12 उताराही देण्यात आला आहे.   नेमक्या जागेबाबत  ‘नही’च्या अधिका:यांशी चर्चा करू. - रूबल अग्रवाल, जिल्हाधिकारी.