शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा!

By admin | Updated: March 23, 2016 00:21 IST

धुळे : महापालिकेत अनधिकृत बांधकामे 30 दिवसांत काढून घेण्याच्या (52/53)च्या नोटिसा बजावल्या़

धुळे : महापालिकेत वादविवादांचे वादळ काही प्रमाणात थंडावले असतानाच आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी मंगळवारी मुंबईला रवाना होण्यापूर्वी 40 नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने अनधिकृत बांधकामे 30 दिवसांत काढून घेण्याच्या (52/53)च्या नोटिसा बजावल्या़ त्यामुळे मनपात एकच खळबळ माजली आह़े

शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर भोगवटा प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला़ आ़मदार गोटे यांच्या तक्रारीनुसार, 2013 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवकांनी अर्जात नमूद केलेला पत्ता व निवडणुकीतील शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या राहण्याच्या पत्त्यावरील मिळकतीची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र सादर केलेले नाही़ त्यामुळे सर्व नगरसेवकांवर महाराष्ट्र अधिनियम 1949, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्यामुळे महापालिका अधिनियम 1949 चे कलम 10 च्या पोटकलम 1 (ड) मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती़ त्यानुषंगाने आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेत सर्व नगरसेवकांना नोटीसवजा पत्र देऊन भोगवटा प्रमाणपत्र व बांधकाम परवानगीबाबत माहिती सादर करून खुलासा करावा, असे स्पष्ट केले होत़े जवळपास 66 नगरसेवकांना त्या वेळी नोटीसवजा पत्र देण्यात आल्याने शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले होते व आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता़ मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेने माघार घेतल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्या वेळी माघार घेतली होती़ तरीदेखील महासभेत ठराव करून नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी न्यायाधीशांचा सल्ला घेण्यात यावा, असा ठराव करण्यात आला होता़ त्या वेळी मनपात प्रचंड तणाव निर्माण झाला होता़ त्यानंतरही भोगवटा प्रमाणपत्राला दोन वेळा मुदतवाढ देऊन तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला होता़

गेल्या तीन महिन्यांपासून भोगवटा प्रमाणपत्राबाबत शांतता प्रस्थापित झालेली असतानाच मंगळवारी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा 40 नगरसेवकांना नोटिसा काढल्या आहेत़ या नोटिसीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे नगरसेवकांनी भोगवटा प्रमाणपत्राबाबत सादर केलेला खुलासा समाधानकारक नाही, तसेच नगरसेवकांकडे भोगवटा प्रमाणपत्र नसणे, बांधकाम परवानगी नसणे व मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसणे या कारणास्तव नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़

मंगळवारी दुपारून आयुक्त डॉ़ नामदेव भोसले मुंबईला रवाना झाल़े परंतु रवाना होण्यापूर्वीच त्यांनी सर्व नोटिसांवर स्वाक्ष:या केल्या आहेत़ नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून आतार्पयत 39 नगरसेवकांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाने दिली़ एका नगरसेवकाला बुधवारी नोटीस बजावली जाणार आह़े भोगवटा प्रमाणपत्रावरून पुन्हा वादंग होणार हे आता स्पष्ट झाले आह़े