शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

रावेर शहर हद्दवाढीतील नागरिकांना पाणीपट्टीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:06 IST

गत पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच बुधवारी सकाळी पालिकेची झूम मिटींग झाली.

ठळक मुद्दे रावेर पालिकेच्या सभेत निर्णयहद्दवाढीतील नवीन कर प्रणालीच्या सर्वेक्षणाला मुदतवाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

रावेर, जि.जळगाव : शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या २७ वाढीव नागरी वसाहतीतील नागरिकांचा दुपटीतील साधारण पाणीपट्टी कराचा १ हजार ६०० रुपयांचा निम्मा बोझा कमी करून शहरवासीयांप्रमाणे नियमितपणे १ हजार ६०० रुपयांची आकारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. गत पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच बुधवारी सकाळी पालिकेची झूम मिटींग झाली.शहराभोवती गत ३५ ते ४० वर्षांपासून उसने नागरिकत्व उपभोगताना २१२ शेतांमध्ये वसलेल्या २७ नागरी वसाहतींना शहरातील नागरिकांपेक्षा दुपटीने सर्वसाधारण पाणीपट्टीचा कर भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, गत नोव्हेंबर २०१९ पासून शासनाने शहर हद्दवाढीला अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या २७ नागरी वसाहतींमधील नागरिकांचा सर्वसाधारण पाणीपट्टीचा कर आता निम्म्याने कपात करून नियमीत शहरवासीयांप्रमाणे लागू करण्यात यावा अर्थात पूर्वीच्या दुपटीने आकारण्यात येणाºया साधारण पाणीपट्टी करात निम्मे कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न.पा.च्या पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच झालेल्या झूम मिटींगमध्ये सर्वानुुमते पारीत करण्यात आला. त्यामुळे शहरहद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नागरिकांच्या तीन हजार २०० रु. साधारण पाणीपट्टी कराप्रमाणे ३० लाखांपैकी १५ लाख रूपयांचा भुर्दंड माफ होणार असल्याचा दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे शहर हद्दवाढीतील मालमत्तेचे सर्वेक्षण करणे दुरापास्त ठरले असल्याने नवीन करप्रणाली लागू करण्यासाठी सर्व्हेक्षणाला एक वर्ष मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय सर्वानुुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.दरम्यान, ‘लोकमत’ने स्टेशनरोडच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असल्याने त्या रस्त्याच्या दुरुस्तीची लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी स्पष्ट केले.न.पा.सभागृहातून नगराध्यक्षा दारा मोहंम्मद, उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सकाळी साडेअकरापासून झूम अ‍ॅप्सद्वारे संपर्कात होते. नगरसेवक प्रल्हाद महाजन, ललिता बर्वे, आसिफ मोहंमद, अ‍ॅड.सूरज चौधरी, सुधीर पाटील, सादीक शेख, असदुल्ला खाँ, यशवंत दलाल, संगीता वाणी, संगीता अग्रवाल, संगीता महाजन, रंजना गजरे, प्रकाश अग्रवाल, जगदीश घेटे अशा १६ नगरसेवकांनी झूम अ‍ॅप्स मिटींगमध्ये सहभाग घेतला.शहरातील नळपाणीपुरवठा योजना २० ते २५ वर्षांपूर्वीची जीर्ण झाली आहे. यामुळे संपूर्ण विस्तारलेल्या शहरासाठी ३५ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहे. लवकरच तांत्रिक सहायकाचे रक्कम वर्ग करून नगरविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याबाबत उहापोह झाला. किंबहुना, न.पा.प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शक्यतो नोव्हेंबरनंतर निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने तत्संबंधी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सादर केली.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRaverरावेर