शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाला मिळालेल्या 25 कोटीच्या निधीचे पुनर्नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 12:44 IST

लवकरच बांधकाम विभागासोबत बैठक : निधी बांधकाम विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रसिद्ध होणार

ठळक मुद्देनिधी जिल्हा प्रशासनाकडेच जून 2015 मध्ये जिल्हा दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी निवेदन दिले होतेअद्याप ही त्यातून विकास कामांना प्रारंभ झालेला नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 6 -  शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त 25 कोटींच्या निधीचा प्रवास लवकरच जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होणार आहे. या निधीतून करण्यात येणा:या कामांच ेपुनर्नियोजन करण्यात आले असून एलईडी पथदिवे, नाल्यांचे मजबुतीकरण व मध्यवर्ती भागात इलेक्ट्रीक केबल भूमिगत केल्या जाणार आहेत. या संदर्भात आठवडाभरात सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या अधिका:यांसमवेत बैठकही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील रस्ते विकासासाठी विकास निधी मिळावा म्हणून जून 2015 मध्ये जिल्हा दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी निवेदन दिले होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी 25 कोटींचा निधी जाहीर केला होता व तो दोन वर्षानंतर प्राप्त झाला व अद्याप ही त्यातून विकास कामांना प्रारंभ झालेला नाही.25 कोटींचा महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेला निधी जिल्हा प्रशासनाकडेच आहे. हा निधी साधारणत: पुढील आठवडय़ात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया या विभागाकडून सुरू केली जाणार आहे. बांधकाम सोबत होणार बैठकआमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यात कामाच्या नियोजनाबाबत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत कामांच्या नियोजनावर चर्चा होईल. लवकरात लवकर बैठक व्हावी व त्यात कामांची निश्चिती केल्यानंतर त्यांना प्रारंभ करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. असा आहे नवा प्रस्तावआता तिसरा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात 10 कोटी रूपये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी, 5 कोटी नाल्यांना संरक्षण भिंत बांधणे, 5 कोटी मुख्य रस्त्यांवरील विद्युत केबल भूमिगत करणे.यात टॉवर चौक ते बस स्टॅंडपर्यतचा रस्ता प्रस्तावित आहे. उर्वरित पाच कोटीत गटारींची कामे प्रस्तावित करावीत की नाही? यावर चर्चा सुरू आहे. कारण शहरात भूमिगत गटारींची कामे होणार आहेत. त्यात प्रत्येक भागातील गटार ही भूमिगत गटारीस जोडली जाणार आहे. त्यामुळे ही कामे रद्द करून भूमिगत केबलची कामे जास्त करता येतील काय? अशी चर्चा लवकरच करून निर्णय घेतला जाणार आहे.