शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर नगरसेवकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर नगरसेवकांच्या तक्रारी बंद झाल्या आहेत; मात्र यामागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी थेट ६० नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून महिन्याला १५ हजार रुपयांप्रमाणे हप्ता घेतल्याचा आरोप केला होता. मात्र,

सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलिसांनी केलेल्या तपासणीत वॉटरग्रेसची कागदपत्रे व डायरी सापडल्याने या महिन्याची वॉटरग्रेसची

‘खुशी’ ला अनेक नगरसेवकांनी दाराबाहेरूनच नकार दिल्याचे समोर आले आहे.

मनपाकडून सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिल्यानंतर हा मक्ता चांगलाच गाजत आहे. पहिल्या टप्प्यात कामाच्या तक्रारीनंतर या

कंपनीचे काम थांबविण्यात आले होते; मात्र चार महिन्यांचा ‘ब्रेक’ नंतर पुन्हा वॉटरग्रेसच्या कामाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात

वॉटरग्रेसच्या कामाच्या तक्रारी थांबल्या असल्या तरी नगरसेवकांबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून १५

हजारांची ‘खुशी’ मिळत असल्याचे आरोप अनेकांकडून होत आहेत.

डायरीतील नावे अन‌् भीती वाढली

बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलिसांनी तपासणी केल्यानंतर याठिकाणी वॉटरग्रेसची कागदपत्रेही आढळून आली.

तसेच पोलिसांना याठिकाणी डायरी सापडली असून, या डायरीत काही जणांची शॉर्ट नावे सापडली आहेत अन‌् त्यापुढे काही आकडे देखील

आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेने ठराविक नगरसेवकांमध्ये भीती वाढली आहे. यामुळे अनेकांनी या

महिन्याचा ‘वॉटरग्रेस’ च्या ‘खुशी’ला दुरूनच नकार दिला आहे. दरम्यान, काही मनपा कर्मचाऱ्यांनी ही रक्कम नाकारली असल्याचीही

माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. बड्या नगरसेवकाकडे हे वाटपाचे काम होते. मात्र, त्यानेही रक्कम देण्यास व व्हॉट्सॲपवरून कॉल

करण्यासही नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्या नगरसेवकांनी ही रक्कम घेतली होती, त्यापैकी अनेकजण ही

रक्कम परत करण्याचा तयारीत आहेत.

‘घरकूल’मधून बोध

घरकूल प्रकरणात अनेकांचा प्रत्यक्ष सहभाग नसतानाही केवळ स्वाक्षरी व ठरावामुळे शिक्षा भोगावी लागली आहे. यामुळे वॉटरग्रेसमध्ये

देखील अशा प्रकारे फसण्याची शक्यता असल्याने अनेकांनी यापासून दूर राहणेच आता पसंत केले आहे. तसेच वॉटरग्रेसबाबत ॲड.विजय पाटील यांनीही काही नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे. त्याबाबत नगरसेवकांमध्ये भीती वाढली आहे.