शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून विनामोबदला नियमित योग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:30 IST

देवीदास महाजन यांचा उपक्रम

पी. आर. माळीचोपडा : मानवी जीवनात योगसाधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग करण्यासाठी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र, प्रशिक्षण देणारी व्यक्ती तज्ज्ञ असावी. कारण चुकीच्या पद्धतीने योग करणे धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच मोठमोठ्या शहरांसह सगळीकडेच योग क्लासेस उपलब्ध आहेत. इतर शिकवण्यांसारखाच हादेखील व्यवसाय बनत चालला आहे. कारण योग शिकणारांची संख्याही त्या तुलनेत वाढतेयं. त्यामुळे योग शिकविण्याचे वर्ग घेऊन भरपूर पैसे कमाविले जातात. मात्र, धानोरा येथील देवीदास महाजन गेल्या पाच वर्षांपासून ग्रमस्थांना योगासने शिकवितात. तेही अगदी विनामोबदला. सकाळी ५:३० ते ६:३० ही त्यांची नियमित वेळ. हा अवलिया योग प्रशिक्षक लाभला हे सुदैवच, असे धानोरावासीय सांगतात.धानोरा, ता. चोपडा येथे सतपंथ ज्योत मंदिराच्या हॉलच्या वर गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे एखाद्या व्रतस्थाप्रमाणे योगविद्येचे धडे गिरवून घेणारे देवीदास हिरामण महाजन हे गावातीलच झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा एक वर्षाचा योग पदविका अभ्यासक्रम एम.जे. कॉलेज, जळगाव येथील अभ्यासकेंद्रातून पूर्ण केला. तेव्हापासून ते कोणताही मोबदला न घेता अविरतपणे योग प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.सोहम विविधता व संशोधन विभाग जळगाव येथील प्रशिक्षकांच्या साहाय्याने त्यांनी अनेकदा मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून उपचार करण्यावर त्याचा भर आहे. त्यांच्या नित्याच्या प्रशिक्षणात १० ते ७० वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध सारेच असतात. त्यात महिला, मुलींचाही समावेश असतो.