शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावकरांना नियमित पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

धरणगाव : लॉकडाऊनमुळे पंप येण्यासाठी झालेला विलंब आणि जुन्या पाईपलाईनमुळे शहरात आज पाणीपुरवठा विस्कळीत असला तरी आगामी निवडणुकीपूर्वी शहरात ...

धरणगाव : लॉकडाऊनमुळे पंप येण्यासाठी झालेला विलंब आणि जुन्या पाईपलाईनमुळे शहरात आज पाणीपुरवठा विस्कळीत असला तरी आगामी निवडणुकीपूर्वी शहरात पाईपलाईनची कामे सुरू न झाल्यास मते मागण्यासाठी येणार नाही आणि धरणगावकरांना नियमित व सुरळीत पाणी दिल्यावाचून राहणार नसल्याची ग्वाही पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरवासीयांना दिली. महात्मा गांधी उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांचा समाचार घेत आपण शहर विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.

सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून पाणी पुरवठ्याबाबत त्यांच्यावर टीका केली होती. याला पाटील यांनी मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात जोरदार प्रत्युत्तर दिले.

तुमच्या मंत्र्यांनी काय केले... भाजपला सवाल

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आज तुम्ही आमच्यावर टीका करत असले तरी तुमचाच पालकमंत्री हा पाटबंधारे खात्याचा पाच वर्ष मंत्री असूनही गिरणा वा तापीचे पाणी अडवू शकला नाही. तुमचे खासदार आठ-दहा वर्षांपासून बलून बंधारे....बलून बंधारेचे गुणगाण गात असले तरी पुढे काही एक होत नाही. यामुळे तुम्ही आधी तुमच्या नेत्यांना प्रश्‍न विचारा. टीका करा, मात्र औकातीत रहा. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. आज शहरासाठी तब्बल २० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात लवकरच भर पडणार आहे, असेही ते म्हणाले.

मंत्री पाटील यांनी याप्रसंगी पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पाणीपुरवठा करण्यासाठी एक पंप पुरेसा असतांना आम्ही डीपीडीसीतून दोन पंपांना निधी मंजूर केला. मात्र तब्बल दीडशे एचपी क्षमतेचा हा पंप जळगावला बनत नसून तो बाहेरून बोलवावा लागतो. लॉकडाऊनमुळे हा पंप येण्यासाठी विलंब झाला आहे. मात्र लवकरच पंप येऊन पाणीपुरवठा नियमित होईल. दरम्यान, शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली असली तरी पाईपलाईन जुनीच आहे. यातच पाणी वाटपाचे नियोजनही विस्कळीत आहे. या बाबी दुरुस्त करण्यात येतील.

असे होणार उद्यानाचे सुशोभिकरण

महात्मा गांधी उद्यानात अँपीथिएटर तयार करणे, लहान मुलांच्या खेळण्यासाठी अद्ययावत साहित्य बसवणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे , लॉन तयार करणे, विविध जातीच्या फुलझाडांची लागवड करणे व ओपन जिम तयार करणे, विद्युतीकरण करून आकर्षक लायटिंग करणे व सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वृक्षांची लागवड व संगोपन करण्यात येणार आहे. दोन कोटींची ही कामे आहे.

या कामांच्या शुभारंभ मंत्री पाटील यांनी केला.

याप्रसंगी माजी महापौर व नूतन जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे केवळ वल्गना करणारे नसून तब्बल ६१ कोटींचा शहर विकासासाठी ऐतिहासिक निधी मंजूर केला उद्यानाच्या सुशोभिकरांच्या कामांमुळे स्व. सलीम पटेल यांचे स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांची शिवसेनेच्या जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी नेमणूक झाल्याने तसेच तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक झाल्याने त्यांचा धरणगाव शिवसेनेतर्फे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नपाचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक सुरेश महाजन, जितेंद्र धनगर, शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, वासुदेव चौधरी, सुरेखा महाजन, अंजलीताई विसावे, धुळे येथील नगरसेविका प्रियंका जोशी, भानुदास विसावे, मोहन महाजन, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ, तौसिफ पटेल, विलास महाजन, विनोद रोकडे, पप्पू कंखरे, रवी जाधव, नपाचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, शाखा अभियंता बिऱ्हाडे, तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, युवासेनेचे संतोष महाजन यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आभार विनोद रोकडे यांनी मानले.

फोटो क्रमांक ०९ एचएसके ०१

विविध कामांचा शुभारंभ करताना गुलाबराव पाटील. सोबत इतर पदाधिकारी व अधिकारी.