शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी एबी फॉर्म नाकारल्याने संताप

By admin | Updated: February 2, 2017 01:14 IST

भाजपा कार्यालयातील घटना: प्रशांत पाटील व संजय भोळे यांच्यात खडाजंगी

जळगाव : भाजपाने आसोदा ममुराबाद गटात विदगाव येथील सिमा प्रशांत पाटील यांची उमेदवारी 28 जानेवारी रोजी जाहीर केली होती. पण सिमा पाटील यांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही एबी फॉर्म दिला नाही. या गटात सिमा पाटील यांची जाहीर उमेदवारी मागे घेऊन आसोदा येथील रुपाली संजय भोळे यांना एबी फॉर्म देण्यात        आला. आपल्याला ऐनवेळी डावलले, गटबाजी केली म्हणून व्यथा मांडण्यासाठी बुधवारी दुपारी सिमा पाटील यांचे पती प्रशांत पाटील हे जामनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी गेले. महाजन यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत पाटील यांनी माहिती दिली. तसेच नाराजी व्यक्त केली. कानळदा गटातही भाजपात गटबाजीभाजपाने कानळदा गटात विजय भिकन सोनवणे यांना उमेदवारी डावलल्याने विजय सोनवणे यांनी कानळदा गणात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कानळदा गणातील भाजपाचे कार्यकर्ते संजय चौधरी यांनाही डावलल्याने त्यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. भोकर गणातही शालीक पाटील यांना डावलल्याने त्यांचीही समजूत काढण्यात आल्याची माहिती मिळाली. भाजपातील गटबाजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आली. आसोदा ममुराबाद या जि.प.गटात मागील पंचवार्षिकमध्ये संजय भोळे यांचा काँग्रेसचे बळीरामदादा सोनवणे यांनी पराभव केला होता. या वेळेस भाजपाने या गटात विजय मिळविण्यासाठी कोळी, लेवा पाटीदार यांची एकगठ्ठा मतांची खेळी ्रकरीत प्रशांत पाटील यांच्या पत्नी सिमा पाटील यांना उमेदवारी दिली. 28 रोजी त्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रपरिषदेत जाहीर केलेल्या यादीत सिमा पाटील यांचे नाव होते. पण नंतर आसोदा व परिसरातील लेवा पाटीदार समाजातील व्यक्तींनी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिका:यांची भेट घेतली व या गटात लेवा पाटीदार व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा मुद्दा रेटून धरल्याचे सूत्रांनी सांगितले.