शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या प्रकारावरून शिक्षकांमध्ये संताप

By admin | Updated: April 13, 2017 00:32 IST

चोपडा : शासकीय निर्णयाबाबत शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शनाचा अभाव

चोपडा : पंचायत  समितीच्या  शिक्षण विभागामार्फत बदल्यांबाबत १२ एप्रिल शेवटचा दिवस होता. मात्र शासनाचे परिपत्रक एकाही प्राथमिक शाळेकडे  न पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक यांनी मार्गदर्शन न केल्यामुळे आज अचानक विनंती अर्ज देण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचा निरोप पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. प्राथमिक शिक्षकांना एकाच तालुक्यात २० वर्षे नोकरीला झाले असतील अशा शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातच; परंतु बाहेर तालुक्यात केल्या जातात. मे महिन्यात या बदल्या होत असतात. मात्र यंदा शासनाने  बदल्यांबाबत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानिहाय बदल्या होणार आहेत. मात्र हे परिपत्रकच शिक्षण विभागामार्फत शाळेकडे पाठविले नाही. मार्गदर्शन कोणीही केले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच आता नेहमीप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी असे क्षेत्र न ठेवता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा यासारखे दहा निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची गावे घोषित करणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे, शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे यासारखी कामे झालेलीच नाही.  अनेक गोष्टींबद्दल संभ्रम असल्याने  शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात  शिक्षक जमले होते.  राष्ट्रवादीचे शिक्षक तालुकाध्यक्ष सतीश बोरसे यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नाराजी व्यक्त करणाºया शिक्षकांमध्ये  सतीश बोरसे, नामदेव कोळी, विलास पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, उज्ज्वल पाटील, धनराज पाटील, अमृत पाटील, भीमसिंग राजपूत आदींचा समावेश आहे.  सदर शासन निर्णय केंद्राप्रमुखांमार्फत सर्व शांळामध्ये पाठविला आहे. परिपत्रक समजायलाही एकदम स्पष्ट आणि सोपे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व कार्यवाही केली आहे.                -एस.सी.पवार, गटशिक्षणाधिकारी, चोपडा